सहाय्यक पोलिस आयुक्त राजन माने यांना “राष्ट्रपती पदक” तर सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक यांना १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर विशेष सेवा पदक पुरस्कार …

सोलापूर
शहर पोलीस आयुक्तालयातील गुण शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त राजन आबाजी माने यांना उल्लेखनीय कामगिरीबद्दल भारत सरकारच्या वतीने राष्ट्रपती पदक पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे तर नक्षलग्रस्त भागात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य यंत्रचालक सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संतोष विजय देशपांडे नेमणूक पोलीस दळणवळण व माहिती तंत्रज्ञान विभाग पोलीस आयुक्तालय सोलापूर यांना विशेष सेवा पदक पुरस्कार जाहीर करण्यात आला असून हा पुरस्कार स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर दिला जाणार असल्याने पोलीस आयुक्त एम राजकुमार व इतर सर्वच अधिकारी, सातही पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक,कर्मचारी वृंद यांच्या वतीने तसेच तमाम सोलापूरकरांच्या वतीने गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने व सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संतोष विजय देशपांडे त्यांच्यावर शुभेच्छा चा वर्षाव करण्यात येतोय…



