solapur

सोलापूर महानगरपालिकेची रस्त्यांवरील ‘अजोरा, मलबा, उचलणे कामास सुरवात

सोलापूर: सोलापूर महानगरपालिका आयुक्त डॉ सचिन ओम्बेसे यांच्या आदेश नुसार शहरातील विविध रस्त्यालगतचा आणि पदपथांवरील ‘अजोरा, मलबा हटवण्याची विशेष मोहीम दर शुक्रवारी करण्याच्या मोहिमेस सुरुवात झाली.
सोलापूर महापालिकेकडून शहरातील 8 झोन मधील विविध रस्त्यावर राबवण्यात आली. या मोहिमेमध्ये शहरातील विविध भागांतील रस्त्यांवर पडलेला अजोरा,बांधकाम साहित्याचा राडारोडा हा जेसीबी आणि डंपरच्या मदतीने हटवण्यात आला.
मोहिमेतील प्रमुख ठिकाणे:
आजच्या मोहिमे करीता ८ जेसीबी आणि ७ डंपर चा वापर करण्यात आला.
* झोन क्र. १: लक्ष्मी मार्केटजवळील दोन ठिकाणे, पंच कट्टा.
* झोन क्र. २: मड्डी वस्ती (दोन ठिकाणे), रूपाभवानी मंदिर.
* झोन क्र. ३: कन्ना चौक, लक्ष्मी मंदिर, विणकर बाग, कोंडळे .
* झोन क्र. ४: माधव नगर, विमान तळ, पाटील नगर.
* झोन क्र. ५: वामन नगर, डी-मार्ट समोर, कंबर तलाव.
* झोन क्र. ६: सलगर वस्ती परिसर.
* झोन क्र. ७: पासपोर्ट ऑफिस ते फडकुले सभागृह, आपतकालीन रस्ता, पोटफाडी चौक (मच्छीवाला सार्वजनिक शौचालय).
* झोन क्र. ८: २ न ST स्थानक ते शानदार चौक ते लेप्रेसी ट्रान्स्फर स्टेशन.

महापालिकेच्या या दर
शुक्रवारच्या विशेष मोहिमेमुळे शहर अधिक स्वच्छ होण्यास हातभार लागणार आहे व सदर मोहीम ही सातत्याने केली जाणार आहे असे अतिरिक्त आयुक्त वीणा पवार यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button