Epaperindia- worldmaharashtrapoliticalsocialsolapur

निष्ठावंत कार्यकर्त्याची “साहेबांनी “घेतली दखल युवा नेतृत्व CA सुशील बंदपट्टे यांना मिळाले कार्याध्यक्ष पद ….

सोलापूर

कोणताही राजकीय वारसा नसताना वडील स्व.चंदू बंदपट्टे यांच्या आदर्शाचा जोपासून सामाजिक कार्याच्या माध्यमातून नाव लौकिक झालेलं नावं CA .सुशील बंदपट्टे . सुशील हे हलाखीच्या परिस्थितीतून उच्च शिक्षित झाल्याने समाजासमोर त्यांनी एक वेगळा आदर्श निर्माण केला . सामाजिक कार्याच्या वाटचालीतून सुशील यांनी राजकीय क्षेत्रात पदार्पण केले . पक्षाशी एकनिष्ठ राहात काँग्रेसची ताकद शहरात कशी वाढेल ? यासाठी त्यांनी अथक परिश्रम घेतले . वंचित घटकाला न्यान्य मिळवून देण्यासाठी सुशील बंदपट्टे नेहमी अग्रेसर असतात . राज्यात जरी पक्ष सत्तेत नसला तरी पुरोगामी विचारांचा वारसा पुढे घेऊन जाण्याचे ते नेहमी करतात . झालेल्या लोकसभा निवडणुकीत खासदार प्रणिती शिंदे यांच्या विजयात सुशील बंदपट्टे यांचा सिंहाचा वाटा आहे . त्याचीच दखल घेऊन राज्याचे माजी केंद्रीय मंत्री सुशील कुमार शिंदे यांनी स्वतः दखल घेऊन पक्ष श्रेष्ठी यांच्या आदेशानुसार स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या अनुषंगाने येणाऱ्या पक्ष संघटन वाढीसाठी व राहुल गांधींचे हात बळकट करण्यासाठी शहराच्या कार्याध्यक्ष पदी निवड केली . याबाबतचे नियुक्ती पत्र माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी त्यांच्या जन वात्सल्य या निवासस्थानी शुक्रवारी ca सुशील बंदपट्टे यांना दिले. व पुष्पगुच्छ देवून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या .

याप्रसंगी उद्योगपती दत्ता सुरवसे, जेष्ठ नेते सुनील रसाळे,शहराध्यक्ष चेतन नरोटे , NSUI अध्यक्ष गणेश डोंगरे तसेच
राजाभाऊ कलकेरी ,दीपक जाधव , महेश अलकुंटे
दत्तात्रय अलकुंटे ,संतोष इरकल,गोपाळ पाथरूट
श्याम मुद्दे ,अशोक यमपूरे ,भीमाशंकर बंदपट्टे ,श्रीनिवास यमपूरे, जयवंत यमपूरे ,राहुल भरले ,अतिश अलकुंटे
कुणाल भांडेकर ,नरेंद्र अलकुंटे
समस्त वडार समाज व चंद्रनील मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दरम्यान पक्षाने जबाबदारीने सोपवलेल्या संधीचे येणाऱ्या काळात नक्कीच सोने करू अशी प्रतिक्रिया नूतन कार्यध्यक्ष ca सुशील बंदपट्टे यांनी K CITY NEWS शी बोलताना दिली .

 

त्यांच्या निवड प्रक्रियेबद्दल पक्ष श्रेष्ठी ,प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ ,खासदार प्रणिती शिंदे, शहराध्यक्ष सर्वच फ्रंटल सेल अध्यक्ष ,कार्यध्यक्ष ,जेष्ठ नेते ,प्रांतिक सेलचे पदाधिकारी ,प्रदेश पदाधिकारी आजी -माजी नगरसेवक ,कार्यकर्ते ,वडार समाजाचे जेष्ठ नेते यांनी CA सुशील बंदपट्टे यांना पुढील यशस्वी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत .

या निवड प्रक्रियेबद्दल बंदपट्टे समर्थकांमधून जल्लोष करण्यात येतोय …..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button