crimemaharashtrapoliticalsocialsolapur
ब्रेकींग:- आईसह दोन चिमुकल्यांचा विहिरीत बुडून मृत्यू….
उत्तर सोलापूर तालुक्यातील वांगी येथील घटना....

सोलापूर :-
उत्तर सोलापूर तालुक्यातील वांगी गावात अज्ञात कारणावरून आईने दोन मुलांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. मृतांमध्ये आई सह दोन सख्ख्या भावंडांचा समावेश आहे.
ही घटना बुधवार (दि.१२) दुपारच्या सुमारास घडली.यात चित्रा बाळासाहेब हाक्के (वय 28) पृथ्वीराज बाळासाहेब हाक्के (वय 5) आणि स्वराज बाळासाहेब हाक्के (वय 2 सर्व. रा. वांगी, ता. उत्तर सोलापूर) अशी मृतांची नावे आहेत.
या घटनेनं ग्रामस्थांमधून हळहळ व्यक्त होत .