शास्त्रीनगर मध्ये गुन्हेगारीचे शिक्षणात परिवर्तन हे घडलं कसं वृत्त सविस्तर ….

सोलापूर
याबाबत अधिक माहिती अशी की सोलापूर शहर परिसरातील शास्त्रीनगर मध्ये कधी काही घडेल याचा नेम नाही बर का” कारण असं म्हटलं जातं की शास्त्रीनगर हे फार डेंजर आहे” परंतु शास्त्रीनगर मध्ये असं देखील घडतंय याचा देखील अभिमान शास्त्रीनगर परिसरातील लोकांना आहे याआधी शास्त्रीनगर मध्ये गुन्हेगारी फार मोठ्या प्रमाणात होत होते” परंतु आता मात्र त्याच गुन्हेगारीला संपवत शास्त्रीनगर परिसरातील युवकांनी शिक्षणाच्या जोरावर एक नवीन शास्त्रीनगर निर्माण केलेले आहेत’ शास्त्रीनगर मध्ये चांगले डॉक्टर्स, चांगले पोलीस कर्मचारी, चांगले वकील, व चांगले समाजसेवक निर्माण होत असून अशातच काही दिवसांपूर्वी दहावी व बारावी परीक्षेचे निकाल लागले असून शास्त्रीनगर परिसरातील उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना एक वेगळे बळ मिळावे यासाठी शास्त्रीनगर परिसरातील सामाजिक कार्यकर्ते वाहिद बिजापुरे यांनी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थी व विद्यार्थिनींना पुष्पहार अर्पण करून त्यांच्या हातात संविधान देऊन विद्यार्थ्यांचे सन्मान पर सत्कार करण्यात आले.
दरम्यान यावेळी बोलताना वाहिद बिजापुरे म्हणाले की देशाला आता संविधानाची गरज आहे” आपण युवा पिढी संविधानाच्या जोरावर नक्कीच देश हितासाठी काहीतरी वेगळे करावे” संविधानाच्या मुल्यांवर चालत पुढील आयुष्यात चांगले नागरिक बनावे,असे यावेळी बोलताना बिजापुरे म्हणाले” यावेळी पालकांनी आणि स्थानिक नागरिकांनी या उपक्रमाचे कौतुक केले. विद्यार्थ्यांमध्येही या सत्कारामुळे नवीन प्रेरणा आणि देशभक्तीची भावना निर्माण होईल अशी भावना व्यक्त केली उत्तीर्ण झालेले विद्यार्थी
सानिया मोहम्मद अली शेख – 92%
फरीजा रियाज अहमद बीजापुरे – 88%
दानिश मोहम्मद गौस बेलिफ – 88%
दानिश ईलियास शेख – 81%
अब्दुल रहमान महबूब – 80%
सानिया बीजापुरे – 73%
असे असून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आले पहा