maharashtrapoliticalsocialsolapur

ड्रेनेज कामामुळे परिसरातील आरोग्य आणि स्वच्छता निश्चितच सुधारणार-किसन जाधव….

प्रभाग २२ येथे ड्रेनेज लाईन कामाचे शुभारंभ....

 

सोलापूर

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांच्या सहकार्यातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव आणि कार्यसम्राट नगरसेवक नागेश गायकवाड यांच्या विशेष प्रयत्नातून प्रभाग क्रमांक २२ मधील रेवणसिद्धेश्वर नगर झोपडपट्टी येथे सोलापूर महानगरपालिका सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियान (जिल्हास्तर) सन २०२३-२४ या अंतर्गत २ लाख ८१ हजार ८२० रुपये खर्चित ड्रेनेज लाईन कामाचे शुभारंभ करण्यात आला.

 

याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेश युवक सरचिटणीस चेतन नागेश गायकवाड,शिवाजी सुरवसे,सिद्धाराम पवार,अफजल पठाण,फिरोज पठाण, मल्लू जाधव,अविनाश मुकरंबे,चेतन सुरवसे, राहुल हत्ती,सुमित खानापुरे,यशवंत माळगे,सुरज नंदर्गी, मनोज मम्हाणे, प्रभावती पवार, मीनाक्षी मुकरंबे, शालन ताई साळुंखे जाधव, महानगरताई माळगे, सुनंदाताई सुरवसे, निर्मला माळी मस्के, जयश्री म्हेत्रे आदींच्या उपस्थितीत विधिवत पूजन होऊन या ड्रेनेज लाईन कामाचे शुभारंभ करण्यात आले.

 

प्रभाग क्रमांक २२ मधील विविध वस्ती मधील नागरिकांच्या तक्रारीची दखल घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांच्या सहकार्यातून आणि माझे सहकारी कार्यसम्राट नगरसेवक नागेश गायकवाड यांच्या प्रयत्नातून प्रभाग क्रमांक २२ मधील नागरिकांना मूलभूत सुविधा पुरवण्यासाठी कोट्यावधी रुपयांचे कामे आतापर्यंत करण्यात आले आहेत.

आज रेवणसिद्धेश्वर नगर झोपडपट्टी येथे ड्रेनेज लाईन कामाचे शुभारंभ करण्यात आले लवकरच हे काम पूर्ण होईल या ड्रेनेज लाईन कामामुळे परिसरातील आरोग्य आणि स्वच्छता निश्चितच सुधारणार असल्याचे यावेळी किसन जाधव म्हणाले. दरम्यान यावेळी प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button