maharashtrapoliticalsocialsolapur

आयुक्तांचा पालिका कर्मचाऱ्यांना दणका:-तक्रार पोर्टलवरील प्रलंबित तक्रारींवर कडक कारवाई – १३ कर्मचाऱ्यांवर आर्थिक दंड…

 

 

सोलापूर

 

सोलापूर महानगर पालिकेच्या वतीने नागरिकांच्या दैनंदिन समस्यांचे तातडीने निराकरण करण्याच्या उद्देशाने ‘आपली तक्रार पोर्टल’ व ‘माय सोलापूर अॅप’ ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या माध्यमातून नागरिकांकडून नोंदविलेल्या तक्रारींचे संबंधित विभागात मुदतीत निवारण करून त्याची माहिती पोर्टलवर अद्ययावत करण्याचे निर्देश सर्व विभागीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना वारंवार देण्यात आलेले आहेत.
सोलापूर महानगरपालिकेच्या ‘आपली तक्रार पोर्टल / माय सोलापूर’ अॅपवर नागरिकांकडून प्राप्त तक्रारी निर्धारित वेळेत निकाली न काढल्याबद्दल विविध विभागातील 13 कर्मचाऱ्यांवर प्रशासकीय दंड आकारण्यात आला आहे. दि. 20/02/2025 रोजीच्या आढाव्यात या कर्मचाऱ्यांकडे एकूण ४१ तक्रारी प्रलंबित असल्याचे आढळले.

 

 

यासंदर्भात हे स्पष्ट करण्यात येते की, काही कर्मचारी तक्रारींचा निपटारा न करता त्या दीर्घकाळ प्रलंबित ठेवत असल्याचे तसेच दंडात्मक कारवाईच्या दिवशी तक्रारी ट्रान्स्फर केल्याचे आढळून आले आहे. दि. २० नोव्हेंबर २०२५ रोजीच्या ‘आपली तक्रार पोर्टल’वरील Pending After Time अहवालानुसार खालील अधिकारी/कर्मचारी यांच्या तक्रारी प्रलंबित असल्याचे आढळून आले आहे पुढील अधिकारी कर्मचारी यांच्यावर दंडत्मक कारवाई करण्यात आली आहे.

 

 

१) प्रशिक बडोळे – विभागीय कार्यालय क्र. ५ – दंड ₹५०००
२) परशुराम बोमकट्टी – विभागीय कार्यालय क्र. ५ – दंड ₹२०००
३) सुफियान पठाण – अतिक्रमण विभाग – दंड ₹५००
४) सुरज ढवळे – विभागीय कार्यालय क्र. ५ – दंड ₹५००
५) संजय पाटील – विभागीय कार्यालय क्र. ५ – दंड ₹५००
६) इरशाद जरतार – नगर अभियंता कार्यालय – दंड ₹५००
७) इमरान बागवान – नगर रचना विभाग – दंड ₹५००
८) प्रमोद गोविंदवार – नगर रचना विभाग – दंड ₹५००
९) येशुदास गायकवाड – भूमी व मालमत्ता कार्यालय – दंड ₹५००
१०) गणेश काकडे – नगर रचना विभाग – दंड ₹५००
११) विष्णु कांबळे – नगर अभियंता विभाग – दंड ₹५००
१२) गणेश साखरे – नगर अभियंता विभाग – दंड ₹५००
१३) हारुण सिद्दीकी – नगर अभियंता विभाग – दंड ₹५००

नागरिकांच्या तक्रारींचे वेळेत निराकरण न करणे, तक्रारी प्रलंबित ठेवणे तसेच केलेल्या कार्यवाहीची माहिती वेळेत अद्ययावत न करणे या कामकाजातील निष्काळजीपणाच्या कारणास्तव उपरोक्त सर्व कर्मचाऱ्यांवर महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम ५६ (२)(ड) अनुसार आर्थिक दंड ठोठावण्यात आला आहे.

 

 

 

सदर दंडाची रक्कम संबंधित कर्मचाऱ्यांच्या माहे नोव्हेंबर २०२५ (पेड इन डिसेंबर २०२५) च्या मासिक वेतनातून एकरकमी वसूल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

 

 

महानगरपालिका प्रशासनाकडून सर्व विभागांना पुन्हा एकदा स्पष्ट सूचना देण्यात येत आहेत की, नागरिकांच्या तक्रारींचे तातडीने व परिणामकारक निवारण करणे ही प्रत्येक कर्मचाऱ्याची प्राथमिक जबाबदारी असून जोपर्यंत तक्रार प्रणाली वेळेत अद्ययावत ठेवली जात नाही, तोपर्यंत अशा प्रकारची कडक कारवाई सातत्याने केली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button