maharashtrapoliticalsocialsolapur

महेश गादेकरांनी साकारलेल्या पेंटिंगवर धर्मेंद्र यांनी दिली होती दाद…

 

सोलापूर

 

 

शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष महेश गादेकर यांनी प्रसिद्ध अभिनेता धर्मेंद्र यांची दोन अँक्रॅलिक कलर मध्ये पेंटिंग साकारली आहेत.
8 जानेवारी 2015 रोजी पुण्यातील एका कार्यक्रमात त्यांनी अभिनेता धर्मेंद्र यांना दोन्ही पेंटिंग दाखवली. त्यावेळी धर्मेंद्र यांनी दोन्ही पेंटिंगवर सही करत अप्रतिम अशी दाद दिली होती.
महेश गादेकर हे मुळात कलाकार आहेत.

 

 

पुण्यातील अभिनव कला महाविद्यालयातून त्यांचे चित्रकलेचे शिक्षण झाले आहे. ते समाजकारण आणि राजकारणात सक्रिय असले तरी चित्रकलेची आवड मात्र त्यांनी अजूनही जोपासली आहे. त्यांनी खासदार शरदचंद्र पवार, गुलजार यांच्यासह त्यांनी इतर अनेक पेंटिंग्ज साकारली आहेत.

 

…..
या दोन पेंटिंग मधील सिंगल पोट्रेट धर्मेंद्र यांना खूप आवडले. ते पोर्ट्रेट त्यांनी फार्म हाऊसमध्ये लावण्यासाठी मागितले. परंतु मी आठवण म्हणून माझ्याकडेच ठेवण्याचा निर्णय घेतला.
महेश गादेकर

 

सस्नेह निमंत्रण सस्नेह निमंत्रण सस्नेह निमंत्रण 

स्वर्गीय विष्णुपंत कोठे प्रतिष्ठानच्या वतीने मोफत सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यंदाचे हे दुसरे वर्ष असून बुधवार दिनांक 26 नोव्हेंबर 2025 रोजी संध्याकाळी 05 वाजून 42 मिनिटे या गोरज मुहूर्तावर हा विवाह सोहळा पार पडणार आहे. तरी नववधूवरांना शुभाशीर्वाद देण्यासाठी आपण अगत्य येण्याचे करावे असे आवाहन प्रतिष्ठानचे संस्थापक, आमदार देवेंद्र दादा कोठे यांनी केले आहे.

स्थळ – स्वर्गीय खासदार लिंगराज वल्याळ क्रीडांगण, कर्णिक नगर जवळ, सोलापूर

अक्षता वेळेवर संपन्न होणार असल्याने सर्वांनी किमान 15 मिनिटे आधी मांडवात येऊन स्थानापन्न व्हावे ही विनंती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button