entertainmentindia- worldmaharashtrapoliticalsocial

ब्राह्मण समाजातील तरुणांना उद्योग व्यवसायासाठी अर्थ साहाय्य मदत मिळावी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे श्री परशुराम आर्थिक विकास महामंडळ विभागाकडे लेखी निवेदनाद्वारे मागणी…

सोलापूर

श्री परशुराम आर्थिक विकास महामंडळ यांच्यावतीने सोलापुरातील ब्राह्मण समाजातील तरुणांना उद्योग व्यवसायासाठी आर्थिक मदत मिळावी या मागणीचे निवेदन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव महेश कुलकर्णी यांनी श्री परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष तथा कॅप्टन आशिष दामले यांना दिले.

या निवेदनात ब्राम्हण समाजातील तरुणांना कर्जवाटप हे तातडीने करण्यात यावे. ब्राह्मण समाजातील तरुणांच्या उद्योग व्यवसायासाठी 15 लाखाच्या वर आर्थिक तरतूद करण्यात यावी तसेच सामूहिक उद्योग साठी 50 लाखापर्यंत कर्ज उपलब्ध करून दिल्यास ब्राह्मण समाजातील तरुणांना उद्योग व्यवसायात अधिक मदत होईल.

तसेच महामंडळाचे आर्थिक बजेट वाढवण्यात यावे. ब्राह्मण समाजातील तरुणांना महामंडळा विषयी अधिकची माहिती करून देण्यासाठी उपाययोजना कराव्यात जेणेकरून समाजातील तरुणांना अधिकाधिक याचा फायदा घेता येईल अशा प्रमुख मागण्या या निवेदनात करण्यात आल्याची माहिती महेश कुलकर्णी यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
हे निवेदन देतेवेळी भाजपा च्या शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर,सरचिटणीस शेखर फंड, यांची उपस्थिती होती…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button