मजरेवाडीत युवा नेते नितीन मुसळे यांचा वाढदिवस जल्लोषात साजरा….

सोलापूर
सामाजिक , उद्योजक,शैक्षणिक क्षेत्रात. आपल्या कार्याच्या माध्यमातून अल्पावधीतच लोकप्रिय झालेले नितीन मुसळे यांचा वाढदिवस कस्तुर बाग मजरेवाडी येथे जल्लोषात साजरा करण्यात आला. गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक क्षेत्रातील नितीन मुसळे यांचं योगदान मोठ आहे .प्रत्येकाच्या हाकेला धावून येणार नेतृत्व युवा कर्तुत्व युवक वर्गात नितीन मुसळे यांचा दबदबा आहे ..
अश्या कर्तुत्ववान नेतृत्वाच्या सत्कार सोहळ्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी विशेष हजेरी लावली. नितीन मुसळे यांच्या वाढदिवसानिमित्त फोनवरून , प्रत्यक्ष भेटी – गाठी घेऊन, सोशल मीडियावरून मुसळे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.
या सत्कार सोहळ्या प्रसंगी हिंगुलांबिका शाळेचे मुख्याध्यापक, पुस्तक प्रेमी प्रमोद हांचाटे सर, राहुल स्वामी ,शैलेश वाडकर, बाबळसुरे सर , रंगदळ सर , अवसेकर सर , नाटेकर सर , वाघमारे सर व सर्व मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते….