पंढरपुरातील जिल्हा परिषद शाळा येथे वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा…

सोलापूर
जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील गोपाळपूर लेंगरे वस्ती येथील जिल्हा परिषद शाळेत श्रीकृष्ण सार्वजनिक वाचनालय यांच्या वतीने नुकताच वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी भारतरत्न माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन नानासाहेब लेंगे यांनी केले.
यावेळी भारतरत्न एपीजे अब्दुल कलाम यांच्या कार्याची माहिती शाळेचे शिक्षक संतोष कुलकर्णी सर यांनी विद्यार्थ्यांना दिली. तसेच श्रीकृष्ण सार्वजनिक वाचनालय यांच्या वतीने विद्यार्थ्यांना तीच पुस्तकांचा संच वाचण्यासाठी भेट स्वरूपात देण्यात आला.
यावेळी ग्रंथालयाचे ग्रंथपाल प्रशांत जाधव, यांनी व अध्यक्ष विठ्ठल पडवळे यांनी डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांच्या विषयी आपल मनोगत व्यक्त केल. यावेळी मनोगतात मुलांनी वाचनाची कला आत्मसात करण्याचे व अवांतर वाचन करण्याचे आवाहन केले.यावेळी शिक्षक जाधव , संध्या शिंदे , कविता ठेंगील , व पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते….




