crimeindia- worldmaharashtrapoliticalsocialsolapur

अधीक्षक नितीन धार्मिक यांची बदली सोलापूर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे नूतन अधीक्षक भाग्यश्री जाधव…

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बदल्यांच्या प्रक्रियेला वेग...

सोलापूर

HTML img Tag Simply Easy Learning

आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सध्या बदल्यांचे सत्र सुरू असून राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक यांची बदली आता चंद्रपूरला झाली असून त्यांच्या ठिकाणी आता बुलढाण्याच्या अधीक्षक भाग्यश्री पंढरीनाथ जाधव हे सोलापूरचा पदभार स्वीकारणार आहेत.याबाबतचे परिपत्रक शनिवारी गृह विभागाच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आले.अधीक्षक नितीन धार्मिक यांनी त्यांच्या काळात शहर – जिल्ह्यात विविध ठिकाणी कारवाईचा धूमधडाका करून अवैध दारू वाहतूक विक्रेते ,ढाबा चालकांना चांगलाच दणका दिला होता. अवैध दारू विरोधात सातत्याने कारवाई करून जिल्हा हातभट्टी दारू मुक्त व्हावा याकरिता अधीक्षक नितीन धार्मिक यांनी विशेष परिश्रम घेतले . आणि सोलापूर जिल्हा दारूमुक्त केला आहे..

२०२३-२४ आर्थिक वर्षात प्रतिबंधात्मक कारवाई करून 224 गुन्हेगारांकडून एकूण 98 लाख 55 हजार रुपये किमतीचे चांगले वर्तणुकीचे बंधपत्र घेण्यात आले.

गोवा राज्यातील दारु विरुद्ध गुन्हे नोंदवून शासनाच्या महसुलाच्या संवर्धन करण्यात आले.त्यांच्या याच कारवाई मुळे सोलापूर शहर – जिल्ह्यात त्यांची एक विशेष ओळख निर्माण झाली होती .

अधीक्षक नितीन धार्मिक यांनी बदलीनंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना माझ्या तीन वर्षाच्या कार्यकाळात  सर्व पत्रकार बांधवांचे अमूल्य सहकार्य लाभले ज्यामुळे मी माझी सोलापूर जिल्ह्यातील तीन वर्षाची कारकीर्द यशस्वीरित्या पूर्ण करू शकलो असे मनोगत व्यक्त केले…

आता तशीच अपेक्षा भाग्यश्री जाधव यांच्या कडून पूर्ण होणार का? धार्मिक यांनी त्यांच्या कार्य काळात केलेल्या कारवाईचा धूम धडाका यापुढे देखील सुरू राहणार का ? याकडे आता सोलापूरकरांचे लक्ष लागून राहिले आहे.सोलापूर प्रमाणेच चंद्रपूर येथे देखील अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या कारवाईचा धूम धडाका चंद्रपूर करांना नक्कीच पाहायला मिळेल यात शंका नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button