maharashtrapoliticalsocialsolapur

देवेंद्र कोठे यांच्याच पाठीशी खंबीरपणे राहण्याचा नागरिकांचा निर्धार…

मोनिका कोठे, किसन जाधव आणि नागेश गायकवाड यांच्या आवाहनाला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद...

 

सोलापूर : प्रतिनिधी

भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, आरपीआय (ए) महायुतीचे शहर मध्य विधानसभेचे उमेदवार देवेंद्र कोठे यांच्याच पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा निर्धार मतदार बंधू भगिनींनी व्यक्त केला. देवेंद्र कोठे यांच्या प्रचारार्थ प्रभाग क्रमांक २२ मध्ये मोनिका कोठे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आणि माजी नगरसेवक किसन जाधव, माजी नगरसेवक नागेश गायकवाड यांनी सोमवारी नागरिकांच्या घरोघरी जाऊन संवाद साधला. त्यांच्या आवाहनाला नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिला.

प्रभाग क्रमांक २२ मधील मोठी इरण्णा वस्ती, हुच्चेश्वर महाराज मठ, भूषण नगर, सिद्धारूढ मठ परिसर, गुलशन नगर, बाबासाहेब तालीम परिसर, आम्रपाली चौक परिसरातील नागरिकांशी संवाद साधत भाजपा आणि महायुतीचे उमेदवार देवेंद्र कोठे यांच्या पाठीशी नागरिकांनी उभे रहावे, असे आवाहन करण्यात आले.

याप्रसंगी रुक्मिणी जाधव, वैशाली गोली, माजी नगरसेविका सरस्वती कासलोलकर, नागनाथ कासलोलकर, सोलापूर महानगरपालिकेचे स्थायी समितीचे माजी सभापती देवेंद्र भंडारे, करेप्पा जंगम, बाबू म्हेत्रे, मारेप्पा कंपल्ली, माजी नगरसेविका मीनाक्षी कंपल्ली, अंबादास करगुळे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस चेतन गायकवाड, गजू शिंदे, रेवण बुक्कानुरे आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia

gem visa