maharashtrapoliticalsocialsolapur

BIG Breaking:-उपमुख्यमंत्री अजितदादा पवार राष्ट्रवादी पक्षाचे सोलापूर संपर्कमंत्री …

 

HTML img Tag Simply Easy Learning

मुंबई..

. राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत आज सायंकाळी अजितदादा यांच्या देवगिरी या निवासस्थानी सर्व मंत्री आमदार जिल्हाध्यक्ष आणि कार्याध्यक्ष यांची महत्त्वाची बैठक संपन्न झाली …

पक्षाची पुढील रूपरेखा आगामी काळात पक्षाचा अजेंडा आणि वाटचाल या विषयावर राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मार्गदर्शन केले या बैठकीत पक्ष संघटनेला ताकत देण्याकरीता राज्यातील विविध जिल्हय़ाचे संपर्कमंत्री म्हणून मंत्रीमंडळात मंत्री यांना देण्यात आले यामध्ये सोलापूर जिल्ह्य़ाची संपर्कमंत्री म्हणून जबाबदारी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी घेतली..
याप्रसंगी अजितदादाना भेटून जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांनी भेटून अभिनंदन करून आभार ही मानले .

अजितदादा सोलापूरचे संपर्कमंत्री झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला असून आनंद व्यक्त होत आहे येणार्या काळात अजित दादा सोलापूर संपर्कमंत्री झाल्याने सोलापूरकरांचे प्रश्न तसेच पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त यांची कामे मार्गी लागून सोलापूर शहर जिल्ह्य़ात विकास होऊन राष्ट्रवादीची ताकत वाढणार आहे असे जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांनी सांगितले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button