crimeEpaperindia- worldmaharashtrapoliticalsocialsolapur

प्राणघातक हल्ल्याची केस काढून घे म्हणून खून केल्याप्रकरणी बाप लेकांची निर्दोष मुक्तता:- ॲड. मिलिंद थोबडे…

 

सोलापूर

 

मौजे सलगर, ता. अक्कलकोट येथील भिमाशंकर श्रीकांत पोलासे याचा खून केल्याप्रकरणी अटकेत असलेले उमेश मलप्पा पोलासे, उ.व.३२. सुरेश मलप्पा पोलासे, उ.व.३५ यांचेसह मलप्पा गणपती पोलासे उ.व.७८ सर्व रा. सलगर, ता. अक्कलकोट, जि. सोलापूर यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली.
यात हकीकत अशी की, आरोर्षीची शेतजमीन मयत भिमाशंकर श्रीकांत पोलासे यांचे शेतालगत होती व त्यांचेमध्ये वहिवाटीच्या कारणावरून वाद विवाद होते. त्यानंतर दि.०२/०३/२०२१ रोजी शेतीच्या वादातून आरोपींनी कुन्हाड व फावड्याने मारहाण करून मयत मिमाशंकरचे वडील श्रीकांत व भाऊ धोंडप्पा यांना मारहाण केली व त्यानंतर टाटा सुमो वाहन अंगावर घालून मयत भिमाशंकरचा खून करण्याचा प्रयत्न केला होता. त्याअनुषंगाने श्रीकांत पोलासे यांनी आरोपीविरुध्द अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात आरोपीविरुध्द जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंद केला होता. त्यानंतर वेळोवेळी आरोपी मयत भिमाशंकर व त्यांच्या कुटूंबियांना केलेली केस काढून घे म्हणून सतत धमक्या देत होते. दि.०६/०५/२०२४ रोजी मयत मिमाशंकर व त्याचा भाऊ धोंडप्पा शेतीकामासाठी शेतामध्ये गेले व सकाळी ८.३५ वा. च्या सुमारास धोंडप्पा दुसऱ्या शेतात काम करीत असताना, त्यास मयत भिमाशंकरचा ओरडण्याचा आवाज दुसऱ्या शेतातून आल्याने त्याने सदरबाब त्याचे वडील श्रीकांत पोलासे यांना फोन करून सांगितले व त्यानंतर श्रीकांत व धोंडप्पा भिमाशंकर असलेल्या शेताकडे जात असताना, हणमंत पाटीलच्या शेताजवळ पाणंद रस्त्यावर उमेश, सुरेश व मलप्पा हे भिमाशंकर यास दगडाने व लोखंडी पाईपने गारहाण करत असताना दिसल्याने ते ओरडल्याने आरोपी तेथून पळून गेले. त्यानंतर भिमाशंकर यास जखमी अवस्थेत दवाखान्यात आणले असता तो मयत झाल्याचे डॉक्टरांनी कळविले. त्यामुळे पूर्वी केलेली केस काढून घेण्याच्या कारणावरून आरोपींनी भिमाशंकरचा खून केल्याची फिर्याद श्रीकांत पोलासे यांनी अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात दाखल केली होती.

 

 

 

सदर गुन्हयाचा तपास तत्कालीन पोलीस अधिकारी निलेश बागाव यांनी करून गे. न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
खटल्याच्या सुनावणीवेळी सरकारपक्षातर्फे २ प्रत्यक्षदर्शी नेत्र साक्षीदारासह एकूण ११ साक्षीदार तपासण्यात आले.
खटल्याच्या अंतीम युक्तीवादावेळी ॲड. मिलिंद थोबडे यांनी प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांची साक्ष विश्वासार्ह नसून त्यांच्या कृतीवरून त्यांनी घटना प्रत्यक्ष पाहिल्याचा बनाव केल्याचे दिसून येत असल्याचे सांगून पूर्वी दाखल असलेल्या प्राणघातक हल्याच्या केसमध्ये खटला घटनेपूर्वीपासून निकालाकरीता न्यायप्रविष्ठ होता, त्यामुळे केस मागे घे असे म्हणण्याचा व त्यामुळे खून करण्याचा कोणताही प्रश्न उदभवत नसल्याचे सांगितले व नेत्र साक्षीदारांनी त्यांच्या उलटतपासणीमध्ये दिलेल्या कबूली जबाबावरून त्यांची साक्ष अविश्वसनीय व असंभवनिय वाटते.

 

 

 

 

वैद्यकीय अधिकारी यांच्या साक्षीमधील मयत भिमाशंकर यास झालेल्या जखमा अपघाताने होवू शकतात अशी घेतलेली कबूली निदर्शनास आणून देवून अपघाती मृत्युचा गैरफायदा घेवून खोटी तक्रार केल्याचे निदर्शनास आणून दिले व त्यापुष्ठयर्थ न्यायनिवाडे सादर केले ते ग्राहय धरून मा. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश श्री. मनोज एस. शर्मा यांनी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली.

यात आरोपीतर्फे ॲड. मिलिंद थोबडे, ॲड. राजकुमार मात्रे यांनी तर सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील श्री. प्रदिपसिंग राजपूत यांनी काम पाहिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button