maharashtrapoliticalsocialsolapur

उद्योजक यतीन शहा यांची भेट घेऊन देवेंद्र कोठे यांनी केली सोलापूरच्या उद्योगविश्वावर चर्चा…

सोलापूरच्या तरुणांना रोजगार मिळण्याबाबत सल्लामसलत...

 

सोलापूर : प्रतिनिधी

सोलापूर शहर मध्य विधानसभेसाठी प्रचार करताना भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय (ए) महायुतीचे उमेदवार देवेंद्र राजेश कोठे यांनी शुक्रवारी प्रिसिजन कॅमशाफ्टचे व्यवस्थापकीय संचालक यतीन शहा यांची भेट घेऊन सोलापूरच्या उद्योग विषयावर सविस्तर चर्चा केली. सोलापुरातील तरुणांना सोलापुरात रोजगार मिळण्याबाबत यावेळी सल्लामसलत करण्यात आली.

सोलापुरात उद्योगवाढीला चांगला वाव आहे. त्यामुळे अनेक उद्योग भविष्यात सोलापुरात येऊ शकतात. त्याकरिता शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आगामी काळात प्रयत्न करु अशी ग्वाही यावेळी उमेदवार देवेंद्र कोठे यांनी उद्योजक यतीन शहा यांना दिली.

 

 

याप्रसंगी उमेदवार देवेंद्र कोठे प्रसार माध्यमांशी बोलताना म्हणाले, सोलापुरातील विकासकामे, उद्योग उभारणी, भविष्यातील विकास आदी संकल्पनांसह इतर अनेक विषयांवर यावेळी संवाद साधण्यात आला. याप्रसंगी माजी नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर, प्रिसिजन कॅमशाफ्टचे जनसंपर्क अधिकारी संदीप पिसके आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia

gem visa