maharashtrapoliticalsocialsolapur

श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने शिवरायांना अभिवादन…

सोलापूर :

 

 

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे भव्य राज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. उत्साहपूर्ण वातावरणात आणि शिवभक्तांच्या जयघोषात हा सोहळा संपन्न झाला.यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. शिवरायांच्या पराक्रम, दूरदृष्टी आणि स्वराज्य स्थापनेच्या कार्याचा गौरव करत उपस्थित मान्यवरांनी शिवचरित्रातून प्रेरणा घेण्याचे आवाहन केले.

 

 

 

या कार्यक्रमास सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार भाऊ गोरे, जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य, उपाध्यक्ष इंद्रजीत पवार, सोलापूर महानगरपालिकेचे महापौर विनायक कोंड्याल, उपमहापौर सौ. ज्ञानेश्वर देवकर, सभागृह नेते नरेंद्र काळे, भाजप शहराध्यक्ष रोहिणीताई तळवळकर, स्थायी समिती अध्यक्षा रंजनाताई चाकोते, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मनीष देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.तसेच श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाचे ट्रस्ट अध्यक्ष नानासाहेब काळे, उत्सवाध्यक्ष जयवंत सलगर, ट्रस्ट सदस्य राजनभाऊ जाधव, अंबादास शेळके, बजरंग जाधव, प्रकाश ननवरे यांच्यासह नगरसेवक विनोद भोसले, किरण भंडारी, सदाशिव पवार, माऊली पवार, विजय पुकाळे, नागेश खरात, महेश देवकर, दादा सुरवसे आणि विविध सामाजिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

 

 

 

कार्यक्रमादरम्यान शिवरायांच्या कार्याचा गौरव करणारे विचार मांडण्यात आले. स्वराज्य, सुशासन आणि लोककल्याणाची शिकवण आजही समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले. शिवभक्तांच्या मोठ्या उपस्थितीत आणि “जय भवानी, जय शिवाजी”च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.
श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या राज्याभिषेक सोहळ्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या महान कार्याला अभिवादन करत स्वराज्याच्या प्रेरणेचा जागर जागर जागविण्याचा संदेश दिला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button