maharashtrapoliticalsocialsolapur

पत्रकारांच्या विविध प्रश्नांवर मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी मनीष केत यांची चर्चा

मुंबई

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष तथा नगरसेवक मनीष केत यांनी मंगळवारी मंत्रालयात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन राज्यातील पत्रकारांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत सविस्तर चर्चा केली.
यावेळी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे , आमदार सचिन कल्याणशेट्टी , आमदार देवेंद्र कोठे , श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खिलबुडे, पत्रकार महेश हणमे आदी उपस्थित होते.

 

 

या भेटीदरम्यान पत्रकारांच्या विविध मागण्यांचे निवेद. Guन मुख्यमंत्री फडणवीस यांना देण्यात आले. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य संघटक संजय भोकरे यांना तातडीने पोलीस संरक्षण द्यावे, ज्येष्ठ पत्रकारांच्या पेन्शन संदर्भात सकारात्मक निर्णय घ्यावा, सोलापूर श्रमिक पत्रकार गृह निर्माण प्रकल्पातील तांत्रिक अडचणी सोडवण्यासाठी विशेष बैठक आयोजित करावी तसेच माध्यम क्षेत्रातील अनुभव प्राध्यापक पदासाठी ग्राह्य धरण्यात यावा, अशा महत्त्वपूर्ण मागण्या यावेळी करण्यात आल्या.
पत्रकारांच्या प्रश्नांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक भूमिका घेत शासन पत्रकारांच्या विकासासाठी कटिबद्ध असून त्यांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी राज्य सरकार कायम पत्रकारांच्या पाठीशी उभे राहील, असा विश्वास उपस्थितांना दिला.
मनीष केत यांनी पत्रकारांच्या हक्कांसाठी आणि विविध प्रलंबित प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी राज्यस्तरावर सातत्याने पाठपुरावा सुरू असल्याचे सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button