educationalentertainmentindia- worldmaharashtrapoliticalsocialsolapur

रेणुका महागांवकर यांच्या हृदयस्थ काव्य संग्रहाचे 25 एप्रिल रोजी प्रकाशन…

 

सोलापूर,(प्रतिनिधी)ः

 

 

महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा दक्षिण सोलापूरच्या अध्यक्षा तथा कवयित्री रेणुका अविनाश महागांवकर यांच्या हृदयस्थ या काव्य संग्रहाचे प्रकाशन ज्येष्ठ कवी अशोक नायगांवकर यांच्या हस्ते आणि गायिका सन्मिता धापटे – शिंदे यांंच्या प्रमुख उपस्थितीत शनिवार दि. 25 एप्रिल रोजी सायंकाळी 6. 25 वाजता लोकमान्य टिळक सभागृह चार हुतात्मा पुतळा चौक सोलापूर (अ‍ॅम्फी थिएटर ) येथे होणार असल्याची माहिती कार्याध्यक्ष प्रशांत बडवे यांनी दिली.
कवयित्री रेणुका महागांवकर यांचे तिसरे पुस्तक प्रकाशित होत असताना यापुर्वी सन 2016 मध्ये तुमच्यासाठी आणि सुजाण पालकत्व अशी दोन पुस्तके प्रकाशित झाली होती. यानंतर दि. 25 एप्रिल रोजी हृदयस्थ हे तिसरे पुस्तक प्रकाशित होणार आहे. नीता नितीन हिरवे यांच्या संवेदना प्रकाशन संस्थेकडून प्रकाशनाची जबाबदारी घेण्यात आली आहे. या हृदयस्थ या काव्य संग्रहामध्ये ह्दयाला थेट भिडतील अशा कवितांचा समावेश आहे. जुन्या काळातील अनेक परंपरा आणि संस्कृती तसेच आधुनिक काळातील बदल असा अनोखा संगम तसेच निसर्ग कविता, प्रेमकविता आणि सामाजिक भान असलेल्या कविता या ह्दयस्थ या काव्यसंग्रहात वाचायला मिळणार आहे. कवी अशोक नायगांवकर यांची प्रस्तावना लाभली आहे.

 

 

 

महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा दक्षिण सोलापूरच्या माध्यमातून या ह्दयस्थ काव्य संग्रहाचे प्रकाशन शनिवार दि. 25 एप्रिल रोजी सायंकाळी 6.25 वाजता लोकमान्य टिळक सभागृह चार हुतात्मा पुतळा चौक सोलापूर (अ‍ॅम्फी थिएटर ) येथे होणार आहे या कार्यक्रमाला रसिक श्रोत्यांनी मोठ्यासंख्येने उपस्थित राहावे असे आवाहनही यावेळी करण्यात आले.

 

 

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपाध्यक्ष प्रा.दीपक देशपांडे, कार्यवाह जितेश कुलकर्णी,कोषाध्यक्ष अमोल धाबळे,कार्यकारणी सदस्य प्रकाश मोकाशे, पृथा हलसगीकर, मेधा कुलकर्णी, अविनाश महागांवकर, प्रसिध्दी प्रमुख विनायक होटकर आदी कार्यरत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button