बांधकाम कामगार शिष्यवृत्ती अपहार प्रकरणी जामीन अर्जावर सोमवारी होणार सुनावणी:- अॅड. शशी कुलकर्णी…

सोलापूर
फौजदार चावडी पोलीस स्टेशन येथे शासनाला खोटे कागदपत्रे दाखल करून 3, कोटी 63 लाख रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी 20 जणांवर दाखल असलेल्या गुन्ह्यातील एक आरोपी बाळासाहेब विलास शिंदे वय- 43 रा – पंढरपूर यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी दिनांक 13/04/2026 रोजी श्री पी. पी.राजवैद्य साहेब यांचे कोर्टासमोर होणार आहे.
यात थोडक्यात हकीकत की, बांधकाम कामगारांच्या मुलासाठी असलेल्या विविध शैक्षणिक योजनांसाठी बनावट बोनाफाईड शैक्षणिक कागदपत्रे सादर करून शासनाची रक्कम रुपये 3 कोटी 63 लाख 20 हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी सहाय्यक कामगार आयुक्त यांनी दि. 4/03/2026 रोजीच्या फिर्यादी नुसार गुन्हा रजिस्टर नंबर 250/2026 अन्वये फौजदार चावडी पोलीस स्टेशन येथे नोंदणी अधिकारी, कंत्राटी कर्मचारी आणि दलाल अशा एकूण 20 जणांविरुद्ध गुन्हा दाखल झालेला आहे. सदर गुन्ह्यामधील अटक आरोपी बाळासाहेब शिंदे यांनी ॲड. शशि कुलकर्णी यांचे मार्फत सोलापूर येथील जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये जामीन अर्ज दाखल केला असून त्याची सुनावणी सोमवार दिनांक 13/04/2026 रोजी श्री पी. पी. राजवैद्य साहेब यांचे कोर्टासमोर होणार आहे.
याकामी आरोपीतर्फे अॅड. शशी कुलकर्णी, ॲड.गुरुदत्त बोरगांवकर, अॅड. प्रसाद अग्निहोत्री तर सरकारतर्फे एम. एम. देशपांडे हे काम पाहत आहेत.



