crimemaharashtrapoliticalsocialsolapur

गुलमोहोर सोसायटी परिसरातील हल्लेखोर मोकाट कुत्र्यांचा पालिका आयुक्तांनी केला बंदोबस्त…

स्थानिक नागरिकांनी मानले पालिका आयुक्तांचे आभार ...

सोलापूर

गेल्या कित्येक महिन्यांपासून शहरात मोकाट कुत्र्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला असून या मोकाट कुत्र्यांमुळे सोलापूरकरांचा जीव अक्षरशः मेटाकुटीला आला आहे.वसंत विहार येथील गुलमोहोर सोसायटी परिसरात राहणाऱ्या नागरिकांना जीव मुठीत घेऊन कामानिमित्त घराबाहेर पडावे लागत आहे .याबाबत पत्रकार वैभव गंगणे यांनी पत्रकारिते सोबतच सामाजिक बांधिलकी ची जाणीव ओळखून ही गंभीर बाब सोलापूर महानगर पालिकेचे कर्तव्य दक्ष आयुक्त सचिन ओंबासे यांच्या निदर्शनास आणून दिली.

या तक्रारीची दखल घेत पालिका आयुक्त सचिन ओंबासे यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना याबाबत योग्य त्या सूचना देत मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यास सांगितले.त्या नुसार गुरुवारी या मोकाट कुत्र्यांना पकडण्यासाठी सोलापूर महानगर पालिकेचे डॉग स्कॉड पथक गुलमोहोर सोसायटी येथे दाखल झाले. व त्यांनी कुत्र्यांना पकडले.

ही मोकाट कुत्रे रोज जेष्ठ नागरिक,महिला बालगोपाळ यांच्या अंगावर हल्ला करत होती . या कुत्र्यांना पकडल्यामुळे स्थानिक नागरिकांकडून सोलापूर महानगर पालिका प्रशासनाचे विशेष आभार प्रकट करण्यात येत आहेत….

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button