crimeEpaperindia- worldmaharashtrasocialsolapur

सोलापूर तालुका पोलीस ठाणे ,मोहोळ ,माळशिरस , अकलूज ,कुर्डुवाडी ,टेंभुर्णी या हद्दीतील घरफोड्या उघकीस चोरट्यास अटक स्थानिक गुन्हे शाखा पथकाची दमदार कामगिरी ….

एकूण १४ लाख ९३ हजारांचा मुद्देमाल हस्तगत...

पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण यांनी जिल्हयामध्ये घरफोडी करणाऱ्या आरोपींचा शोध घेवुन गुन्हे उघड करून मुद्देमाल हस्तगत करण्याबाबत स्थानिक गुन्हे शाखेकडील पोलीस निरीक्षक, संजय जगताप व त्यांच्या अधिपत्याखालील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना मार्गदर्शन व सुचना दिल्या होत्या. त्यावरून संजय जगताप, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, यांनी स्थानिक गुन्हे शाखेकडील तपास पथकांचे अधिकारी यांना मार्गदर्शन करून गुन्हे उघड करण्याबाबत व रेकॉर्डवरील गुन्हेगार यांचे शोध घेणेकामी आदेशीत केले होते.

 

 

 

संजय जगताप पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप-निरीक्षक, सुरज निंबाळकर व त्यांचे पथक टेंभुर्णी पोलीस ठाणे हद्दीत मालाविषयी गुन्हयाचे तपासाकामी गस्त घालत असताना पोहेकॉ/४२५ विजय कुमार भरले यांना गोपनिय बातमी दारामार्फत बातमी मिळाली की, रेकॉर्ड वरील आरोपी नामे मंगेश उर्फ मनशा तरंगफुले काळे याने सोलापूर तालुका पोलीस ठाणे गुरंन १९५/२०२५ बीएनएस-२०२३ चे ३३१ (४), ३०५ (अ) हा गुन्हा केला आहे. तो सध्या टेंभुर्णी येथील टेंभुर्णी ते अकलुज कडे जाणा-या अकलुज चौकात फिरत आहे. सदरची बातमीच्या अनुषंगाने पोलीस उप-निरीक्षक सुरज निंबाळकर व त्यांचे पथक सदर बातमीच्या ठिकाणी पोहोचुन बातमीतील वर्णना प्रमाणे असलेल्या इसमास सापळा खुन पथकाने ताब्यात घेतले. या इसमाकाडे त्याचे नावं गाव व पत्ता विचारले असता त्याने त्याचे नावं मंगेश उर्फ मनशा तरंगफुले काळे वय ४२ वर्षे, रा. भाटनिमगाव ता. इंदापुर जि. पुणे. असे असल्याचे सांगितले. त्यावरून नमुद आरोपीकडे पोलीस उप-निरीक्षक /निंबाळकर व त्यांचे पथकाने अधिक तपास केला असता, आरोपी मंगेश उर्फ मनशा तरंगफुले काळे व त्याचे साथीदार १) राम कालुराम भोसले २) श्याम कालुराम भोसले दोघे रा. पिटकेश्वर ता. इंदापुर जि. पुणे याने मिळून सोलापूर तालुका पोलीस ठाणे गुरंन १९५/२०२५ बीएनएस-२०२३ चे ३३१ (४), ३०५ (अ) हा गुन्हा केल्याची कबुल केले.

 

 

 

या आरोपीकडे सखोल तपास करता त्यांनी मोहोळ, टेंभुर्णी, कुर्डवाडी, माळशिरस, अकलुज, पंढरपुर याठिकाण मागील काही महिन्यामध्ये त्याचे साथीदारा सोबत सोलापूर तालुका पोलीस ठाणे ,मोहोळ ,माळशिरस , अकलूज ,कुर्डुवाडी ,टेंभुर्णी या हददीत घरफोडी करून चो-या केल्याची कबुली दिली.

 

 

या दोन्ही आरोपी यांच्याकडे कौशल्यपुर्ण तपास करता या गुन्हयात चोरीस गेले मुद्देमाला पैकी एकुण ४,०६,३००/- रू. सोन्या चांदीचे दागिणे व १,८३,०००/- रू. किमतीचे मोबाईल हॅन्डसेट असे एकुण किंमत ५,८९,३००/-रू. त्याची (चालु बाजार भाव प्रामणे) एकुण १४,९३,०००/- रू किमतीचा मुद्देमाल आरोपी याचेकडुन हस्तगत करण्यात आले आहे. पुढील तपास पोलीस उप-निरीक्षक / सुरज निंबाळकर, स्था.गु.शा. सोलापूर ग्रामीण हे करीत आहेत.

 

 

आरोपी हे सराईत गुन्हेगार असुन त्यांचे गुन्हे अभिलेख पाहता सोलापूर, यापुर्वी आरोपी यांच्यावर सांगोला, परंडा, बारामती, इंदापुर, याठिकाणी घरफोरी (७) व मारामारीचे (३) सारखे असे एकुण १० गुन्हे गुन्हे दाखल आहेत.

 

 

ही कामगिरी मा. पोलीस अधीक्षक, श्री. अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक, श्री. प्रितम यावलकर, वरीष्ठ पोलीस निरीक्षक, श्री. संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस उप-निरीक्षक सुरज निंबाळकर, पोहेको / सलीम बागवान, हरीदास पांढरे, विजयकुमार भरले, शशिकांत कोळेकर, मपोहेकों / अश्विनी गोटे, पल्लवी इंगळे, दिपाली जाधव, पोकों/अन्वर आत्तार, यश देवकते, समर्थ गाजरे, योगेश जाधव, मपोकों/ सुनंदा झळके, चापोका / दिलीप थोरात व सायबर पोलीस ठाणेकडील व्यंकटेश मोरे यांनी बजावली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button