maharashtrapoliticalsocialsolapur

साहित्य परिषद ही विद्यमान कार्यकारिणीची मक्तेदारी नाही – स्वाती महाळंक

बदल घडवण्यासाठी साहित्य संवर्धन आघाडीला निवडून द्या- प्रदीप निफाडकर...

 

.

 

सोलापूर,( प्रतिनिधी):-

 

महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे पंचवार्षिक निवडणूक सुरू असून साहित्य संवर्धन आघाडी च्या वतीने ही निवडणूक वाढवण्यात येत आहे.विद्यमान अनधिकृत कार्यकारिणी सदस्य साम , दाम , दंड , भेद , अप प्रचार , गुन्हेगारी , दडपशाही , गैरव्यवहार , बेकायदेशीर कारवाया करून महाराष्ट्र साहित्य परिषद कार्यकारिणी सत्ता टिकवण्याचे उद्योग करत आहेत, याचा आम्ही तीव्र निषेध म्हणून आमचे ‘साहित्य संवर्धन आघाडी’ हे पॅनल उभे केले आहे. अशी माहिती स्वाती महाळंक आणि प्रदीप निफाडकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

 

 

 

 

विनोद कुलकर्णी आणि मिलिंद जोशी साहित्य संमेलन व्यासपीठावरून मुख्यमंत्र्यांना धमकी देतात , साहित्य परिषदेत हस्तक्षेत करू नका असा आदेश देतात .निवडणुकीतील विरोधी उमेदवारांवर दबाव आणून उमेदवारी अर्ज भरू नका, असे प्रयत्न करून निवडणूक बिनविरोध करून येथील आपली बेकायदेशीर सत्ता कायम राहील असा प्रयत्न करतात . ह्या सर्वांचा आम्ही निषेध करत आहोत.

 

 

 

आमचा विरोध का?
आमचे आरोप काय? 👇

महाराष्ट्र साहित्य परिषदेची इमारत आपल्या निवडणूक पॅनेलचे , निवडणूक कार्यालय असल्या सारखे त्याचा उपयोग करत होते .
साहित्य परिषदेचा ताबा निवडणूक न घेता गेली पाच वर्ष ठेवला आहे .

न्यायालयात महाराष्ट्र साहित्य परिषद कार्यकारिणी विरोधातील याचिकांचे निकालाच लागू नयेत, यासाठी सर्व न्यायालयीन हातखंडे वापरणे व आपली बेकायदेशीर सत्ता कायम राहील याचा प्रयत्न करणे .

 

 

 

१०० वे अखिल भारतीय साहित्य संमेलनात प्रमुख जबाबदारी देऊ , मानसन्मान देऊ अशी लालुच दाखवणे .

साहित्य परिषदेचा पुरस्काराचे आमिष साहित्यिकांना दाखवून एक दबावाचे राजकारण करणे .

अनाधिकाराने संस्थेची घटना दुरुस्ती करणे सामान्य मराठी साहित्य प्रेमी संस्थेचे सभासद होता येणार नाही या साठी सभासद शुल्क वाढ करणे .

गेली पाच वर्षे सामान्य मराठी साहित्य प्रेमींची सभासद नोंदणी बंद , पण आपल्या परिचयातील , नात्यातील काही लोकांना सदस्य करून घेणे .

धर्मादाय आयुक्त कार्यालय मान्यता नसलेल्या घटना दुरुस्ती आधारे संस्थेच्या निवडणुका घोषित करणे .

निवडणुकीसाठी उपयोगात आणलेल्या मतदार याद्या जाणीवपूर्वक सदोष ठेवणे . दुबार मतदार , मृत मतदार ,पत्ते बदललेले मतदार आहेत अशी संख्या एकूण मतदारांच्या ३०% आहे .

विद्यमान कार्यकारिणीची भूमिका , ना मुख्यमंत्री , ना सामान्य मराठी प्रेमी जनता , ना न्यायालय , ना विरोधी उमेदवार , ना सामान्य नागरीक , ना सामान्य आजीव सभासद महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कार्यात सहभागी होऊ नये .

परिवर्तन पॅनेलच्या जाहीरनाम्यात दिलेली आश्वासन पूर्ण करण्यासाठी या अनधिकृत कार्यकारिणीने गेली १० वर्षात काही का केली
नाहीत ?
कृती समितीच्या पदाधिकारी यांना बदनामीची
कायदेशीर सूचना पाठवणे हा सुध्दा या कार्यकारिणीच्या दबाव तंत्राचा भाग आहे .
या पत्रकार परिषदेला प्रशांत बडवे,नरेंद्र काटिकर,
उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia

gem visa