maharashtrapoliticalsocialsolapur

मतदान केंद्रावर मोबाईल घेऊन गेल्यास मोबाईल जप्त तर होईलच मात्र संबंधीत मोबाईल धारकावर होणार कठोर कारवाई:- संकेत देवळेकर, उपविभागीय पोलीस अधिकारी…

 

.सोलापूर

 

विधानसभा आणि नगरपरिषद निवडणुका प्रमाणेच उदईक रोजी होणा-या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत देखील मतदान केंद्रावर मतदार यांना मोबाईल /भ्रमणध्वनी सोबत घेऊन जाता येणार नाही अशा प्रकारच्या स्पष्ट सूचना मा.राज्य निवडणुक आयोगांनी यापुर्वीच पारित केलेल्या आहेत.
तरीही काही हौशी आणि अतिउत्साही मतदार यंत्रणेची नजर चुकवुन आपल्या सोबत मोबाईल / भ्रमणध्वनी घेऊन जात आपल्या मतदानाची शुटींग करून ती शुटींग समाज माध्यमावर म्हणजे सोशल मिडियावर व्हारयल करतात या प्रकारची मा.राज्य निवडणुक आयोगांनी गंभीर दखल घेत अशा प्रकारे मोबाईल मतदान केंद्रा मध्ये घेऊन जाणे आणि त्याव्दारे व्हिडीओ बनवुन तो समाज माध्यमावर व्हायरल केल्यास संबंधीत मोबाईल धारकाचा मोबाईल जप्त करून त्या मोबाईल धारकावर कठोर कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश प्रशासकीय स्तरावरून सर्व स्थानिक प्रशासनास प्राप्त झाले आहेत.

 

 

 

 

सर्व मतदान केंद्रावर प्रशासनाकडुन सी.सी.टी.व्ही कार्यरत करण्यात आले आहेत.
याव्दारे संकेत देवळेकर, उपविभागीय पोलीस अधिकारी सोलापूर ग्रामीण उपविभाग सोलापूर यांनी सोलापूर ग्रामीण पोलीस दलाच्या वतीने सर्व मतदान बंधु भगिनी यांना त्यांनी मतदान केंद्रावर मोबाईल घेऊन न जाता पारदर्शक आणि तटस्थ वातावरणात मतदानाचा हक्क बजावावा असे आवाहन केले आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button