crimemaharashtrapoliticalsocialsolapur

दरोडा व चोरीच्या एकुण 04 गुन्हयात पाहिजे असलेला आरोपी जेरबंद करुन त्याच्याकडून घरफोडीचे एकुण 12 गुन्हे उघडकीस आणून 82.32 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व 60 ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने असा एकूण 10,85,160/- रु. किंमतीचा मुद्देमाल हस्तगत…

सोलापूर स्थानिक गुन्हे शाखेची दमदार कामगिरी....

 

पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप यांना सोलापूर ग्रामीण जिल्हयातील मालाविषयीच्या गुन्हयात वाढ झाले असल्याने रेकॉर्डवरील फरारी व पाहिजे असलेले आरोपी चेक करुन सदर गुन्हयांना आळा घालून प्रतिबंध करणेकामी आदेशीत करण्यात आले होते. आदेशाप्रमाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप यांनी गुन्हेशाखेकडील दुय्यम अधिकारी व पोलीस अंमलदार यांची वेगवेगळे पथके तयार करुन त्यांना गुन्हे उघडकीस आणणेकामी योग्य ते मार्गदर्शन करुन सुचना दिल्या होत्या.

 

 

 

 

स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप यांना त्यांच्या गोपनीय बातमीदारामार्फत गोपनीय बातमी मिळाली की, सोलापूर ग्रमीण जिल्हयातील मंद्रुप व मंगळवेढा पोलीस ठाणे कडील रेकॉर्डवरील पाहिजे असलेला आरोपी नामे काळया सुरेश पवार रा नंदूर ता. मंगळवेढा, जि. सोलापूर हा डोणज येथे येणार असल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या बातमीप्रमाणे कारवाई करणेकरीता सहा.पोलीस निरीक्षक नागनाथ खुणे व त्यांचे पथकास कारवाई करणेबाबत सांगितले. सपोनि नागनाथ खुणे व त्यांचे पथक मौजे डोणज ता मंगळवेढा येथे जावून मिळालेल्या बातमीप्रमाणे सापळा लावून शोध घेत असताना, बातमीतील इसम हा पोलीसांना पाहुन पळुन जावु लागला, तेंव्हा पथकातील पोलीस अंमलदार यांनी त्याचा पाठलाग करुन शिताफीने पकडले.

 

 

 

 

तेव्हा त्यास ताब्यात घेवून त्यांचे नांव व पत्ता विचारले असता, त्यांने त्यांचे नांव अजित उर्फ काळया सुरेश पवार, वय 29 वर्षे,नंदूर ता. मंगळवेढा जि. सोलापूर असे असल्याचे सांगितले. सदर आरोपीकडे सोलापूर ग्रामीण जिल्हयातील मालाविषयी गुन्हयांच्या अनुषंगाने कौशल्यपूर्ण विचारपूस करता, त्याने त्याचे इतर साथीदारांसोबत मागील 04 महिन्यापूर्वी मंद्रुप ता दक्षिण सोलापूर येथे रात्रीच्या वेळी घरफोडी चोरी केल्याचे सांगितले. तेंव्हा त्यास मंद्रुप पोलीस ठाणे गुरनं 316/2025 बीएनएस 305(अ), 331(4) प्रमाणे दाखल गुन्हयात अटक करुन त्याची 03 दिवस पोलीस कोठडी रिमांड घेऊन तपास करता त्याने सांगितले की, मागील वर्षभरात मंगळवेढा, मोहोळ, व तालुका दक्षिण सोलापूर इत्यादी तालुक्यातील गांवामध्ये घरफोडी चो-या केल्याचे सांगितले. त्याचेकडून सोलापूर ग्रामीण जिल्हयातील घरफोडी चोरी चे एकूण 12 गुन्हे उघडकीस आणुन 82.32 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व 60 ग्रॅम वजनाचे चांदिचे दागिने असा एकुण 10,85,160/- रु किंमतीचा (बाजारमुल्य भावाप्रमाणे) मुददेमाल जप्त करण्यात आला आहे.

 

 

 

 

 

आरोपी नामे – अजित उर्फ काळया सुरेश पवार, वय 29 वर्षे,नंदूर ता. मंगळवेढा जि. सोलापूर ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे .

सदरची कामगिरी पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधिक्षक प्रितम यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि नागनाथ खुणे, विजय शिंदे, पोलीस उपनिरीक्षक कुलदिप सोनटक्के, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक ख्वाजा मुजावर, सफौ नारायण गोलेकर, प्रकाश कारटकर, धनाजी गाडे, पोह/मोहन मनसावाले, धनराज गायकवाड, अक्षय डोंगरे, संदीप हुलगे, चापोकॉ/ सतीश बुरकूल महिला अंमलदार आश्विनी गोटे, दिपाली जाधव व सुनंदा झळके यांनी बजावली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button