crimeindia- worldmaharashtrapoliticalsocialsolapur

मनसे विद्यार्थी शहर प्रमुखाच्या खून प्रकरणातील आणखी 11 आरोपींना 4 दिवसाची पोलीस कोठडी….

 

सोलापूर

 

 

 

जोशी गल्ली, रविवार पेठ परिसरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या वादातून मनसे विद्यार्थी शहर प्रमुख बाळासाहेब पांडुरंग सरवदे याची तलवार व कोयत्याने वार करून निर्घृण हत्या केल्या प्रकरणी फरार आरोपी 1)विशाल शंकर शिंदे 2)सुनील शंकर शिंदे 3)राहुल राजू सरवदे 4)ईश्वर सिद्धेश्वर शिंदे 5)रोहित राजू सरवदे6)महेश शिवाजी भोसले 7)शंकर बाबू शिंदे 8)अनिल शंकर शिंदे 9)शारदा तानाजी शिंदे 10)आलोक तानाजी शिंदे 11)विशाल ऊर्फ दादू संजय दोरकर यांना जेलरोड पोलीस ठाण्याचे पोलिसांनी अटक केली आहे.
याबाबत हकिकत अशी की, मयताचे भाऊ बाजीराव पांडुरंग सरवदे (वय २५, रा. जोशी गल्ली, रविवार पेठ) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपींनी निवडणुकीत उभे राहू नये म्हणून धमकी दिली होती.

 

 

अपक्ष अर्ज मागे घ्या, नाहीतर तुम्हाला जिवंत सोडणार नाही, अशी उघड धमकी देण्यात आल्याचा आरोप आहे. दि. २ जानेवारी रोजी दुपारी १ ते सायंकाळी ४.४५ च्या दरम्यान हनुमान मंदिराजवळ आरोपींनी वाद घालून बाळासाहेब सरवदे यांच्या डोळ्यांत चटणी टाकून त्यांना काहीही दिसू नये अशी स्थिती निर्माण केली. त्यानंतर काही आरोपींनी त्यांचे हात पकडले, तर काही आरोपींनी तलवार व कोयत्याने छातीवर वार करून त्यांना गंभीर जखमी केले उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी जेल रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 

 

या घटनेप्रकरणी काल दि.3/1/26 रोजी अमर शंकर शिंदे, शालन शंकर शिंदे, अतिश शंकर शिंदे, तानाजी बापू शिंदे या चार आरोपींना अटक करण्यात आली होती ते सध्या पोलीस कोठडीत आहेत.उर्वरित वर नमूद सर्व आरोपींना आजरोजी अटक करण्यात आली होती आणि त्यांना आज रोजी मे. न्यायालयात हजर केले होते.

 

 

 

यात आरोपी तर्फे अँड. संतोष न्हावकर, अँड.राहुल रूपनर यांनी तर सरकार पक्षातर्फे अँड.ज्योती वाघमारे यांनी काम पाहिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button