maharashtrapoliticalsocialsolapur

देवेंद्र कोठेंच्या पाठीशी अनंत { नेता } जाधव देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर नंतर नेता यांनी घेतला हा निर्णय…

सोलापूर

शहर मध्यसाठी इच्छुक असलेले माजी नगरसेवक अनंत { नेता }जाधव यांनी देवेंद्र फडणवीस यांची नुकतीच भेट घेतली.देवेंद्र फडणवीस यांनी शहर मध्यसाठी देवेंद्र कोठे यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर अनंत जाधव यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.
यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना आपण जे प्रेम दिले ,विश्वास ठेवला याबाबत आपण भारावून गेलो असून आपल्याबद्दल बोलावं तितकं खरच कमी आहे.आपला जिव्हाळा आणि माझ्यावर असलेला विश्वास याबाबत थोडक्या शब्दात आभार व्यक्त करणे अशक्य आहे.भारतीय जनता पार्टी प्रत्येक वेळी माझ्या पाठीशी पूर्वीपासूनच खंबीरपणे उभी आहे याची मला जाण आहे.मला उमेदवारी दिली नसली तरी मी पक्षावर नाराज नसून पक्ष श्रेष्ठी जो आदेश देतील तो आदेश माझ्यासाठी अंतिम असेल .आणि मी तो आदेश पळणारच. असं आश्वासन दिल.
पक्षाने शहर मध्य साठी देवेंद्र कोठे यांना उमेदवारी जाहीर केली.त्यामुळे पक्षाच्या आदेशानुसार देवेंद्र कोठे यांचा प्रचार करणार असल्याची भूमिका नेता यांनी घेतली. भाजपाने दिलेल्या उमेदवाराच्या विजयासाठी सर्वोतोपरी विशेष प्रयत्न करणार असल्याचे जाधव यांनी माध्यमांना सांगितले.यापुढे ही पक्षाचे अतिशय प्रामाणिकपणे करेन.पक्ष संघटन वाढीसाठी येणाऱ्या काळात देवेंद्र फडणवीस यांचे हात बळकट करण्यासाठी स्थानिक पातळीवर सर्वोतोपरी प्रयत्न करू अशी प्रतिक्रिया अनंत जाधव यांनी माध्यमांशी बोलताना दिली…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia

gem visa