महिलेची छेड काढणा-यास मा. न्यायालयांनी सश्रम कारावास शिक्षा सुनावली

सोलापूर
दिनांक 29.10.2023 रोजी फिर्यादी हया त्यांच्या शेता मध्ये कांदयाच्या पिकात गवत काढणे करीता गेल्या असता आरोपी लक्ष्मण दत्तात्रय गवळी यांनी फिर्यादी हया शेतात एकटी असल्याचा गैरफायदा घेऊन कांदयात खूप गवत झाले आहे असे म्हणुन तिच्या उजव्या हाताला पकडुन चल जाऊ तिकडे असे म्हणुन तिच्या मनास लज्जा वाटेल असे कृत्य केले होते म्हणुन फिर्यादी यांनी सोलापूर तालुका, पोलीस ठाणेस दिलेल्या फिर्यादी वरून आरोपी विरूध्द भारतीय दंड संहिता कलम 354 A प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता. सदर गुन्हयाचा तपास तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक नागाबाई गंपले, नेमणुक सोलापूर तालुका, पोलीस ठाणे यांनी करून गुन्हयातील आरोपी विरूध्द दोषारोप पत्र सादर केले होते.
वर नमूद गुन्हयाची दिनांक 22.12.2025 रोजी मा. श्रीमती ऐश्वर्या जाधव, प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, कोर्ट नं.2 सोलापूर यांचे न्यायालयात सुनावणी झाली आहे.
सुनावणी दरम्यान मा. न्यायालयांनी आरोपीस दोषी ठरवुन आरोपी लक्ष्मण दत्तात्रय माळी, रा. कौठाळी ता. उत्तर सोलापूर जि. सोलापूर यास 6 महिने तुरूंगवास, 5,000/-रूपये द्रव्य दंडाची रक्कम व गुन्हयातील पिडीत हिस 3,000/-रूपये नुकसान भरपाई देण्याची शिक्षा ठोठावली आहे.
वर नमूद खटल्यामध्ये सरकार पक्षा तर्फे एकूण 8 साक्षीदार तपासले आहेत. यामध्ये मुळ फिर्यादी, पंच साक्षीदार व गुन्हयाचे तपासिक अंमलदार यांची साक्ष महत्वाची ठरली आहे.
खटल्यामध्ये श्री. अमोघसिध्द कोरे, सहायक सरकारी अभियोक्ता, मुळ फिर्यादी यांचे तर्फे भडकुंबे वकील यांनी काम पाहिले आहे. सदरच्या गुन्हयामध्ये दोषसिध्दी होणे करीता श्री. संकेत देवळेकर, उपविभागीय पोलीस अधिकारी सोलापूर ग्रामीण उपविभाग सोलापूर व मा.श्री. राहुल देशपांडे, पोलीस निरीक्षक, सोलापूर तालुका, पोलीस ठाणे यांनी मार्गदर्शन केले आहे. कोर्ट पैरवी म्हणुन सोलापूर तालुका, पोलीस ठाणे कडील नेमणुकीस असलेले पोलीस हवालदार सुरेश राठोड यांनी कामकाज पाहिले आहे.



