समाजाची निरपेक्ष सेवा करणे हा भारतीय संस्कृतीचा विचार : पत्रकार रविन्द्र नाशिककर

सोलापूर :
सोलापुरातील नामवंत वैवाहीक संस्था म्हणल की कौस्तुभ वधू-वर सुचक केंन्द्र यामाध्यमातून बरीच मुलामुलींची विवाह जमवून ते त्या त्या ठिकाणी सुखाने नांदत आहेत . या माध्यमातून विवाह समस्यावर बरीच प्रबोधन करत वधूवर परिचय अंक प्रकाशीत करत विवाह चळवळ उभी करून योग्य मार्गदर्शन करत आहेत. असाच एक उपक्रम विवाह समस्या : काल आज उदया या विषयावर ह भ प श्रीकांन्त महाराज अरोळे यांचे या विषयावर प्रबोधन मांगल्य मंगल कार्यालय साई सुपर भारती विद्यापीठ जवळ
जुळे सोलापूर मंगळवार दिनांक ९/१२/२०२५ रोजी सायंकाळी ठिक ५/३० रोजी प्रबोधन तसेच जुळे सोलापूर विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा जुळे सोलापूर रत्न पुरस्कार २०२५ देवून ह भ प श्रीकांन महाराज आरोळे यांचे हस्ते सन्मान करण्यात येणार असून या कार्यक्रमाला श्रीकांत कुलकर्णी सहयोग ब्राम्हण सेवा संघाचे अध्यक्ष तसेच ब्रम्हगर्जना प्रतिष्ठान व भगवान परशूराम जयंतीचे संस्थापक विक्रम ढोनसळे ज्येष्ठ पत्रकार रविन्द्र नाशिककर यांचे उपस्थित होणार असून खास करून जुळे सोलापूरच्या जनतेला हि सांस्कृतीक बौद्धिकची मेजवानी असून वरील उपक्रम सर्वासाठी खुला असून असे आवाहन जुळे सोलापूर महिला समन्वयक ॲड शर्वरी रानडे यांनी केले आहे.



