maharashtrapoliticalsocialsolapur

कृषी मंत्री दत्तात्रय भरणे मामा घेणार सोलापूर शहर राष्ट्रवादीचा आढावा ….

 

सोलापूर.. सोलापूर महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार प्रदेशाध्यक्ष खा. सुनीलजी तटकरे साहेब यांच्या सुचनेनुसार राज्याचे कृषी मंत्री सोलापूर जिल्हा राष्ट्रवादीचे संपर्क मंत्री दत्तात्रय मामा भरणे हे येत्या मंगळवारी 21 ऑक्टोबर रोजी दुपारी 2 वाजता सोलापूर शहर दौऱ्यावर येत असून ते सोलापूर शहरातील राष्ट्रवादीच्या सर्व पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते यांच्याशी बैठक घेऊन संवाद साधणार आहेत

 

 

या बैठकीत पक्षाचा आढावा घेऊन पुढील येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकी संदर्भात मार्गदर्शन करणार आहेत तरी पक्षाचे जेष्ठ नेते प्रांतिक पदाधिकारी सर्व फ्रंटल सेल अध्यक्ष कार्याध्यक्ष तसेच शहर कार्यकारिणीतील पदाधिकारी यांनी उपस्थित रहावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सोलापुर शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांनी केले …

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button