गांजा तस्करी प्रकरणी आरोपीचा जामीन मंजूर:- ॲड .देवदत्त बोरगावकर …

● सोलापूर –
संतोष दत्तात्रय चव्हाण रा. नीरा नृसिंहपूर ता.इंदापूर जि. पुणे याचा गांजा तस्करी केले प्रकरणीच्या गुन्ह्यात सोलापूर येथील विशेष सत्र न्यायाधीश श्री. वाय. ए.राणे साहेब यांनी जामीन मंजूर केला.
यात हकीकत अशी की, दि. 16/8/2025 रोजी विजापूर नाका पोलिसांना एक इसम जय भवानी विजापूर नाका झोपडपट्टी 2 येथे गांजा विक्री करता येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्याप्रमाणे पोलिसानी सापळा रचून धाड टाकली असता तीन इसम कार मध्ये गांजा विक्री करणेसाठी आल्याचे आढळून आले. त्यामुळे सदर आरोपीनं विरुद्ध विजापूर नाका पोलीस स्टेशन येथे गु. र. 438/2025 अन्वये एन. डी. पी. एस. कायदाचे कलम 8 क, 20ब (2), व 29 प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता. सदर गुन्ह्याचा तपास करताना आरोपी संतोष चव्हाण याचे नाव निष्पन्न झालेमुळे पोलिसांनी दि. 19/9/2025 रोजी आरोपीस अटक केली होती.
सदर प्रकरणातील आरोपीने ॲड. देवदत्त बोरगावकर यांचे मार्फत सोलापूर येथील विशेष सत्र न्यालयात जामीन मिळणेसाठी अर्ज दाखल केला होता. सदर जामीन अर्जाची सुनावणी विशेष न्यायाधीश श्री.राणे यांचे कोर्टासमोर झाली. सदरकामी आरोपीच्या वकिलांनी असा युक्तिवाद केला.
आरोपी हा घटनास्थळी आढळून आलेला नाही, आरोपीचे एफ. आय. आर. मध्ये नाव नाही आरोपी विरुद्ध कोणताही ठोस पुरावा नाही.सरकार पक्षाने त्यास जोरदार हरकत घेतली. दोन्ही बाजूच्या वकिलांचा युक्तिवाद विचारात घेऊन न्यायालयाने आरोपीचा जामीन अर्ज मंजूर केला.
या प्रकरणात आरोपीतर्फे ॲड. देवदत्त बोरगावकर, , ॲड. गुरुदत्त बोरगावकर, ॲड.शिवानी करवा, ॲड.निकिता कुलकर्णी,ॲड.उमा कोळी तर सरकारपक्षातर्फे ॲड.शीतल डोके यांनी काम पाहिले.
.



