Businessindia- worldmaharashtrapoliticalsocialsolapur

सोलापूर–हैद्राबाद विमानसेवेची दमदार सुरुवात; पहिल्याच दिवशी उत्साहाचा जल्लोष…

फ्लाय ९१च्या सेवेला जल्लोषात प्रारंभ; विद्यार्थ्यांना पहिल्या विमानप्रवासाची संधी, प्रवाशांचे स्वागत मिठाई व केक कापून

 

 

सोलापूर,

दिनांक : १७/०४/२०२६

 

प्रतिनिधी

 

 

सोलापूर ते हैद्राबाद ही विमानसेवा फ्लाय ९१ यांच्या माध्यमातून अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात सुरू झाली. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार ठरताना सोलापूरकरांनी मोठ्या आनंदात या सेवेला स्वागत केले.

या उद्घाटन सोहळ्याचे विशेष आकर्षण म्हणजे राऊंड टेबल इंडिया, सोलापूर शाखेच्या वतीने सावळेश्वर येथील न्यु समता प्रशालेतील ७ मुली, ३ मुले आणि एका शिक्षकांना त्यांच्या आयुष्यातील पहिल्या विमानप्रवासाचा अनोखा अनुभव करून देण्यात आला. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि उत्सुकता हा क्षण अधिक संस्मरणीय ठरला.

 

 

 

तसेच, सोलापूर–हैद्राबाद प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांना मिष्टी मिठाई पार्क चौक, यांच्या वतीने नाश्त्या व मिठाई चे हँपर वाटप करण्यात आले. सोलापूर विकास मंचच्या वतीने हा उपक्रम राबवण्यात आला, ज्यामुळे प्रवाशांचा प्रवास अधिक आनंददायी झाला.

सोलापूर विकास मंचने सोलापूरातुन नागरी विमानसेवेच्या सुरूवातीसाठी घेतलेली अथक मेहनत आता प्रत्यक्षात उतरत असून विविध शहरात विमानसेवा सुरू होत आहे, शहराच्या विकासाच्या दिशेने हा एक मोठा टप्पा मानला जात आहे.

 

 

 

 

 

यावेळी फ्लाय ९१च्या वतीने प्रवाश्यांना बोर्डिंग पास वाटुन आणि केक कापुन विमानसेवेचे औपचारिक स्वागत करण्यात आले. कार्यक्रमास सोलापूर विकास मंचचे सदस्य केतनभाई शहा, मनोज क्षीरसागर, योगीन गुर्जर, विजय कुंदन जाधव, तसेच मिष्टी मिठाईचे हेमल शहा,उपस्थित होते,
सोलापूर हायफ्लायर्स राऊंड टेबल इंडिया 309 सोलापूर शाखेचे तरंग शहा,अभिषेखा झंवर,नितेश सकलेचा,पुष्कराज कोठारी,रोहित राठी,पंकज सचदेव,अश्विन मुंदडा, फ्लाय ९१चे एअरपोर्ट मॅनेजर राजेश्वर रंणसुभे, व सोलापूर विमानतळ प्राधिकरणाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

 

 

 

 

या नव्या विमानसेवेच्या प्रारंभामुळे सोलापूरहून हैद्राबादमार्गे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील उद्योगजगताशी संपर्क साधणे अधिक सोयीचे होणार आहे. परिणामी, आगामी काळात सोलापूरमध्ये उद्योग-व्यापार क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होण्याची शक्यता विकास मंच च्या सदस्या कडून व्यक्त केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia

gem visa