आनंद चंदनशिवे व गणेश पुजारी यांच्या पाठपुराव्या नुसार बाळे परिसरातील अतिवृष्टी व पूर परिस्थिती बाधित कुटुंबाच्या खात्यावर शासनाकडून अनुदान रक्कम जमा

सोलापूर :
महाराष्ट्राचा सोलापूर शहर जिल्ह्यामध्ये मागील काही महिन्यापासून मोठ्या प्रमाणात पाऊस व अतिवृष्टी झाल्यामुळे बऱ्याच भागामध्ये पर्जन्य परिस्थिती निर्माण झाली असून मा. जिल्हाधिकारी यांना
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे व नगरसेवक गणेश पुजारी यांनी परिसरातील ज्या नागरिकांचे घरे पाण्यामध्ये गेले असून ज्यांचे नुकसान झाले आहे त्यांना शासनाकडून मदत मदत मिळाल्यास अतिवृष्टी बाधित कुटुंबीयांना एक मोठा आधार होईल या अनुषंगाने परिसरातील नागरिकांना शासनाकडून योग्य ती मदत करण्याची मागणी केली होती.
यानुसार बाळे परिसरातील राहुल नगर पाटील नगर माहेश्वरी नगर व संतोष नगर या परिसरातील बऱ्याच घरांमध्ये नाल्याचे पाणी शिरले असून कुटुंबाचे अन्नधान्य, कपडे, जीवनावश्यक वस्तू भिजले असून काही घरांचे पडझड झाल्याने
मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. सदर ठिकाणी नुकसानग्रस्त भागांचे ग्राम महसूल अधिकारी , महसूल सेवक त्याचबरोबर सोलापूर महानगरपालिका विभागीय अधिकारी तसेच स्थानिक नगरसेवक यांच्या उपस्थितीत पंचनामे करून महापालिका प्रशासन तसेच जिल्हा प्रशासन यांच्याकडून राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला.

राज्य शासनाने मागील आठवड्यामध्ये दिवाळीपर्यंत सर्व नुकसान बाधित कुटुंब व शेतकरी यांना रक्कम त्यांच्या खात्यावर जमा करण्यात येईल असे आश्वासित केल्या नुसार आज प्रत्यक्षात नुकसानग्रस्त कुटुंबाच्या खात्यावर पैसे जमा झाल्याने नुकसान ग्रस्त कुटुंबियाने तसेच स्थानिक नगरसेवक आनंद चंदनशिवे नगरसेवक गणेश पुजारी यांनी महापालिका प्रशासन, जिल्हा प्रशासन तसेच राज्य शासनाचे आभार व्यक्त केले आहेत.
नुकसानग्रस्त भागातील कुटुंबांना मदत मिळण्याकरिता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे नगरसेवक गणेश पुजारी मंडल अधिकारी संतोष कांबळे,ग्राम महसूल अधिकारी सिद्धाराम कराळे, कृषी अधिकारी तृप्ती गुंड,महसूल सेवक राहुल तोडकरी,सोलापूर महानगरपालिकेचे विभागीय अधिकारी प्रकाश सावंत, अभियंता राघवेंद्र गायधनकर, सहाय्यक अभियंता गौरव सस्ते, विकास सर्वगोड ,अग्निशामक दलाचे कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.



