69 वा धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त .संस्थेत तर्फे बुद्ध मूर्तीची प्रतिष्ठापना करून पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंची मदत…

सोलापूर
दि.३.१०.२५
जी.एम मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने 69 व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त बुधवार पेठ मिलिंद नगर जीएम चौक येथे तथागत गौतम बुद्ध यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करून सामुदायिक बुद्ध वंदना घेऊन भारतीय जनता पार्टीच्या अध्यक्ष सौ रोहिणी ताई तळवळकर यांच्या हस्ते गौतम बुद्ध यांच्या मूर्तीस पुष्प फुले अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यंदाच्या वर्षी सोलापूर शहर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्यामुळे नदीकाठी असणाऱ्या गावांमध्ये शेतीमध्ये पूरस्थिती निर्माण झाल्यामुळे अनेक नागरिकांचे व शेतकऱ्यांचे नुकसान झाले यामुळे यंदाच्या वर्षी जी एम संस्थे तर्फे लेझीम ताफा व मिरवणूक रद्द मिरवणुकीस येणारा खर्च टाळून पूरग्रस्त नागरिकांना अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूची मदत मागील चार दिवसापासून करण्यात येत आहे आज देखील पाकनी शिवणी या भागातील पूरग्रस्त नागरिकांना अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तू ची मदत भारतीय जनता पार्टीच्या अध्यक्ष सौ रोहिणीताई तळवळकर यांच्या हस्ते देण्यात आले. या वेळी बोलताना रोहिणीताई तडवळकर म्हणाल्या की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामुळे भारतामध्ये महिलांना अधिकार मिळाला म्हणून मी आज विविध पदे भूषवले आहेत असे बोलून धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताच्या सर्व भारतीयांना शुभेच्छा दिल्या व अभार व्यक्त केल्या.

या वेळी प्रमुख उपस्थिती म्हणून जीएम संस्थेचे संस्थापक बाळासाहेब वाघमारे जीएम संस्थेचे आधारस्तंभ दत्ता वाघमारे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे{दादा गट} नेते चंद्रकांत दायमा भारतीय जनता पार्टीचे नेते राजाभाऊ माने जीएम संस्थेचे उत्सवा अध्यक्ष अजहर शेख जीएम संस्थेचे विश्वस्त शशिकांत उर्फ पप्पू गायकवाड भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चाचे अध्यक्ष विजय कुलते,संजय साळुंखे दत्ता शिंदे आप्पासाहेब बागले मुकेश सोनवणे कनिष्क उर्फ व्याकी वाघमारे श्रेयश वाघमारे नरेंद्र शिंदे अभि क्षीरसागर निहाल शिरसागर संतोष कदम रघुराज बनसोडे गौरव पात्रे रवी कांबळे प्रभाकर जगताप यशपाल वाघमारे निशांत वाघमारे आदी शेकडो पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.




