maharashtrapoliticalsocialsolapur

शहर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील अतिवृष्टीग्रस्त भागांची पाहणी…

 

 

सोलापूर

शहर दक्षिण विधानसभा मतदार संघातील विविध भागांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाणी साचून नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले होते. या पार्श्वभूमीवर आज दिनांक २४ सप्टेंबर रोजी प्रत्यक्ष पाहणी करून नागरिकांना दिलासा देण्यासाठी आमदार मा. सुभाष देशमुख व सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी संबंधित ठिकाणी भेट दिली

पाहणीदरम्यान नवोदय नगर, रवींद्र नगर, रामगढ चौक आणि नक्का वस्ती या ठिकाणी नागरिकांच्या अडचणींचा आढावा घेण्यात आला.

या प्रसंगी अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे,सहाय्यक आयुक्त गिरीष पंडित, सहाय्यक आयुक्त मनीषा मगर, नगर अभियंता सारिका आकूलवार, तसेच महानगरपालिकेचे अधिकारीवर्ग, झोन अधिकारी, स्थानिक कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

पाहणी दरम्यान नागरिकांनी पाण्याचा निचरा, गटार व्यवस्था, रस्ते दुरुस्ती आणि स्वच्छतेसंदर्भात आपली मते व अडचणी व्यक्त केल्या. त्यावर आयुक्त डॉ. ओम्बासे यांनी संबंधित विभागांना तात्काळ उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. विशेषतः पावसाचे पाणी तुंबणार नाही यासाठी नालेसफाई व जलनिचर्‍याची गती वाढवण्यावर भर देण्यात आला.तसेच याठिकाणी नाल्या वरती अतिक्रमण झाले असल्यास त्वरित काढून टाकण्यात यावे. . ज्या ठिकाणी नाला अरुंद झाले आहे त्याठिकाणी नालायचे रुंदी करण करावे अश्या सूचना दिल्या.

आमदार मा. सुभाष देशमुख यांनी नागरिकांना विश्वास दिला की, त्यांच्या समस्या तातडीने सोडविण्यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे. तसेच महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी या भागातील पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी नियोजनबद्ध पावले उचलण्याचे आश्वासन दिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button