crimemaharashtrapoliticalsocialsolapur

अखेर अन्नधान्य वितरण अधिकारी ओंकार पडोळे पुन्हा ॲक्शन मोडवर…

सोलापूर

मोदी परिसरातील रास्त भाव धान्य दुकानात गुरुवारी ग्राहकांना धान्य वाटपावेळी ड – २५ ह्या रास्त भाव धान्य दुकानात तांदूळ पोत्या मध्ये मृत सापाचे अवशेष सापडल्याने नागरिकात एकच खळबळ उडाली आहे. काही दिवसापूर्वीच ह्याच भागात दुषित पाण्यामुळे दोन नागरिकांच्या जीव गमावे लागले होते. आता पुन्हा वादग्रस्त असलेल्या रेशन प्रणालीतून चक्क तांदळात मृत सापाचे अवशेष सापडल्याने मोदी परिसरात नागरिकांत भयभीत वातावरण निर्माण झालेले आहे.

 

 

याबाबत नागरिकांनी अन्नधान्य वितरण अधिकारी ओंकार पडोळे यांना तक्रार केली असता, अन्नधान्य वितरण अधिकारी यांनी तात्काळ पथक पाठवून त्या ठिकाणाची चौकशी व त्या तांदळाचे सॅम्पल ताब्यात घेऊन त्याची तपासणी करिता पाठवून देण्यात आले आणि दुसऱ्या दिवशीही संबंधित दुकानाचे धान्याचा पंचनामा करून त्या भागातील नागरिकांची चौकशी व जाबजबाब नोंदविण्यात आले. संबंधित दुकानदाराने याबाबत प्रतिक्रिया देताना धान्य गोडांऊन मधून ज्याप्रमाणे आले त्याप्रमाणे नागरिकांना वाटण्यात आले असे कळविले.

 

पण प्रत्यक्षात नियमाप्रमाणे रेशन दुकानात धान्य आल्यानंतर त्याची पंचनामा होऊन ग्राहकांसाठी त्याची दर्शनी भागात असलेल्या काचेच्या भरणीत त्याचे सॅम्पल ठेवावे लागते.पण तसे न करता संबंधित दुकानदाराने डोळे झाक करून अतिशय निष्काळजीपणे धान्य वाटप केले आहे असे नागरिकांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. याबाबत अन्नधान्य वितरण अधिकारी ओंकार पडोळे यांनी विषयाची गांभीर घेऊन संबंधित दुकानदारास नोटीस बजावली असून 24 तासात त्याचे उत्तर देण्याबाबत कळविले आहे.

 

 

एकंदरीत अतिशय दाट लोकवस्ती असलेल्या भागात असे निष्काळजीपणाने वाटप झालेल्या दुकानावर तात्काळ कारवाई व्हावी असे नागरिकांतून भावना व्यक्त होत आहेत. हा एक प्रकार चा जीवाशी खेळण्याचा प्रकार होत असल्याबाबतही नागरिकांनी चिंताजनक भावना व्यक्त केलेल्या आहेत.आता ह्यावर अन्नधान्य वितरण अधिकारी काय कारवाई करतील याकडे समस्त सोलापूरकरांचे लक्ष वेधून आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button