crimemaharashtrapoliticalsocialsolapur

महिलेचा विनयभंग – आरोपीस अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर

 

दाजी त्र्यंबक लांडगे वय- 60 वर्षे व्यवसाय- काही नाही, रा. सावळेश्वर ता. मोहोळ याने मुलगा राहुल याच्या सोबत मिळून महिलेचा विनयभंग करून शिवीगाळ केल्याप्रकरणी त्यास मे अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश श्री सुरज केंद्रे साहेब यांनी अंतिम अटकपूर्व जामीन मंजूर केला.

 

 

यात हकीकत अशी की,

यातील आरोपीचा मुलगा व फिर्यादीची मुलगी हे पती-पत्नी आहेत, घरगुती कारणावरून त्यांचेत भांडणे असुन कौटुंबिक प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे, दिनांक 09/08/2025 रोजी यातील फिर्यादी हे पोपळी गावात धर्मराजदेवाची यात्रेत कुटुंबासह देवदर्शनासाठी गेले होते, त्यावेळी आरोपी राहुल व फिर्यादी यांच्या मध्ये वाद झाला, सदर वादातून फिर्यादीने आरोपी राहुल व त्याचे वडील दाजी यांचे विरुद्ध विनयभंग व शिवीगाळी करुन जिवे ठार मारण्याची धमकी दिली .

 

 

 

अशा आशयाची फिर्याद मोहोळ पोलीस ठाण्यात दिली. त्यानुसार मोहोळ पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्यानंतर आरोपी दाजी याने ॲड. प्रणव उपाध्ये यांच्यामार्फत मा. न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळण्याकरीता अर्ज दाखल केला. आरोपींच्या वकिलांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून मा. न्यायालयाने आरोपीस अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला.

यात आरोपीतर्फे ॲड. प्रणव उपाध्ये यांनी काम पाहिले तर सरकारतर्फे ॲड दुलंगे यांनी काम पाहिले….

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button