maharashtrapoliticalsocialsolapur

फोंडशिरस खून खटला : जन्मठेपेची शिक्षा झालेल्या दोन्ही सख्या भावांना मुंबई उच्च न्यायालयातून जामीन मंजूर.. ॲड. रितेश थोबडे

 

सोलापूर .

नाना अण्णा वाघमोडे यांचा खून केल्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा झालेले धर्मेंद्र महादेव वाघमोडे व अंकुश महादेव वाघमोडे दोघे राहणार फोंडशिरस तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर यांना मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सुमन शाम व शाम चंडक यांनी जामीन मंजूर केला.

 

 

 

यात हकीकते अशी की, यातील मयत व आरोपी हे एकमेकांचे शेजारी राहण्यास होते. त्यांच्यामध्ये जमिनीचा वाद होता मयताचे घर हे आरोपींच्या जागेत येत असल्याने ते घर काढून टाकण्यासाठी दोघात वाद झाला होता. दिनांक 19/10/2019 रोजी मयत व त्याचा नातू तुषार हे शेळ्या चारण्यासाठी शेतात गेले होते. साधारण चार वाजाच्या सुमारास यातील आरोपी मयताचे घरासमोर येऊन मयताचा मुलगा, त्याची बायको व सून यांना जनावरे हे आमच्या रानात बांधू नका म्हणून शिवीगाळ केली होती, तसेच तुला व तुझ्या वडिलांना जिवंत सोडणार नाही असे म्हणाले होते. त्यानंतर थोड्यावेळाने घराच्या पाठीमागून मेलो मेलो म्हणून असा मोठा आवाज आला. त्यावेळी मयताचे घरचे हे पळत गेले त्यावेळी वरील आरोपी हे पळून जात होते मयत खाली पडला होता त्यावेळी मयताचा नातू तुषार याने सांगितले की जागेच्या कारणावरून आरोपी किरण वाघमोडे, धर्मेंद्र वाघमोडे व अंकुश वाघमोडे यांनी लोखंडी रॉड व लाथा बुक्क्यांनी मारहाण केली होती अशा आशयाची फिर्याद मयताचा मुलगा बापू नाना वाघमोडे याने नातेपुते पोलीस ठाण्यात दिली होती.

 

 

सदरचा खटला हा माळशिरस सत्र न्यायालयात चालला होता, न्यायाधीशांनी सर्व आरोपींना खुनाच्या आरोपाखाली जन्मठेपेची शिक्षा ठोठावली होती.

 

 

त्यावर आरोपींनी एडवोकेट रितेश थोबडे यांचेमार्फत उच्च न्यायालयात अपिल दाखल केले होते. अपिलात धर्मेंद्र व अंकुश यांचा जामीन अर्ज दाखल केला होता.

 

 

अर्जाच्या सुनावणीच्या वेळी, सदर खटल्यात मयताचा नातू तुषार हाच एकमेव नेत्र साक्षीदार असून त्याने दिलेला कोर्टासमोरील जबाब हा पूर्वी दिलेला जबाबा पेक्षा सुधारित जबाब असल्याचे निदर्शनास आणून दिले, त्यावरून न्यायमूर्तींनी दोन्ही आरोपींना 50,000/- रुपयांच्या जातमूचलक्यावर जामीन मंजूर केला.

 

 

*यात आरोपीतर्फे एडवोकेट रितेश थोबडे तर सरकारतर्फे एडवोकेट क्रांती हिवराळे यांनी काम पाहिले.*

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button