श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभुमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने मद्य निर्मिती केंद्रावर केलेल्या धडक कारवाईत एकूण १२,७०,३२०/- रुपयाचा मुद्देमाल जप्त….

सोलापूर
राज्य उत्पादन शुल्क विभाग सोलापूर यांची राजेश देशमुख, आयुक्त, महाराष्ट्र राज्य, प्रसाद सुर्वे (अं व द) मुंबई, व सागर धोमकर विभागीय उपायुक्त पुणे विभाग याच्या निर्देशानुसार भाग्यश्री पं. जाधव, अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क सोलापूर जे. एन. पाटील प्रभारी उपअधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क सोलापूर यांच्या मार्गदर्शनाखाली दि.०२/०९/२०२५ रोजी निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, ब विभग सोलापूर यांच्या कार्यालयास मिळालेल्या खात्रीलायक गुप्त बातमीनुसार स्वामी विवेकानंदनगर, मौजे मुळेगाव तांडा ता, दक्षिण सोलापूर केलेल्या कारवाईत अवैध गोवा बनावटीचा विदेशी मद्य साठा व बनावट देशी-विदेशी मद्य निर्मितीच्या कारखान्यावर धाड टाकुन गोवा राज्य निर्मित विदेशी मद्याच्या ७५० मिलीच्या एकुण ९३६ सिलबंद बाटल्या १८० मिलीच्या १९२ सिलबंद बाटल्या तसेच बनावट देशी मद्याच्या ९० मिलीच्या ८९०० सिलबंद बाटल्या व विविध ब्रेडची १५०० बनावट लेबल व ९५०० बनावट बुचे, विदेशी मद्याच्या रिकाम्या बाटल्या असे बनावट मद्य निर्मितीचे साहित्य असा एकुण रुपये १२,७०,३२०/- चा प्रोव्हि. गुन्ह्यातील मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
तसेच या गुन्ह्यातील संशयीत आरोपी शिशुपल धनु राठोड हा फरार असुन सदर फरार आरोपी विरुध्द गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
तसेच दि. ०१/०८/२०२५ ते ३१/०८/२०५ या कालावधीत एकुण २४९ गुन्हे नोंद करुन २३३ जणांवर कारवाई करुन राज्य उत्पादन शुल्क विभाग सोलापूर यांची सोलापूर शहर व जिल्ह्यात केलेल्या अवैध हातभट्टी निमिती केद्रावर/अवैध देशी-विदेशी मद्य विक्री व वाहतुकीवर केलेल्या धडक कारवाईत ८०,६६० ली. रसायन, ५८८०लि. हातभट्टी दारु, ४०० ब. लि. देशी मद्य, १०६ ब.ली. विदेशी मद्य. ४७ ब.लि. बिअर, १९२४ लि. ताडी, तसेच १२ वाहनासह एकुण रूपये ५०,८१,०९१/-चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
तसेच अशा प्रकारची अवैध हातभट्टी दारु व ताडी विकीवर कारवाई करण्या करीता विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे.
ही कामगिरी निरीक्षक ओ व्ही घाटगे, आर. एम. चवरे तसेच दुय्यम निरीक्षक श्री समाधान शेळके, सुखदेव सिद, शिवकुमर कांबळे, धनाजी पोवार, सचिन शिंदे, रमेश कोलते
राम निंबाळकर अंजली सरवदे सहाय्यक दुय्यम निरीक्षक मुकेश चव्हाण,संजय चव्हाण, जवान सर्वश्री, तानाजी जाधव, कपिल स्वामी, नंदकुमार वेळापूरे, चेतन व्हनंगुटी, अनिल पांढरे, विनायक काळे, पवन उगले, अण्णासाहेब फड, वसंत राठोड, महिला जवान शिवानी मुढे, तसेच वाहनचालक दिपक वाघमारे, सानप, दिपाली सलगर यांनी पार पाडली असुन या गुन्हाचा तपास समाधान शेळके करीत आहेत.
अवैध मद्यविक्री. अवैध निर्मिती व वाहतूकी विरोधात कारवाई या पुढेही चालु राहणार असून अवैध मद्याबाबत माहिती असल्यास टोल फ्री १८००२३३९९९९ क्रमांक अथवा व्हॉटस अॅप क्रमांक ८४२२००११३३ या कार्यालयास माहिती दिल्यास माहिती देणा-याचे नाव गुप्त ठेवले जाईल असे भाग्यश्री पं. जाधव, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क. सोलापुर यांनी सांगुन अवैध मद्याबाबतची माहिती कळविण्याचे आवाहन केले आहे.



