आमदार विजयकुमार देशमुख यांच्या निवासस्थानी उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या शुभहस्ते श्रींची महापूजा आनंदी वातावरणात संपन्न…

सोलापूर
राज्याचे उच्च शिक्षण मंत्री आमदार विजयकुमार देशमुख हे सोलापूर दौऱ्यावर आले असता त्यांनी आमदार विजयकुमार देशमुख यांच्या निवासस्थानी भेट दिली.यावेळी देशमुखांच्या घरातील श्रींची महापूजा मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या शुभहस्ते जल्लोष पूर्ण वातावरणात संपन्न झाली.

यावेळी गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया अशा घोषणा देण्यात आल्या.यावेळी मंत्री पाटील यांचा देशमुख कुटुंबियांच्या वतीने स्वागतपर सत्कार करण्यात आला..

दरम्यान मंत्री पाटील यांनी राज्यात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी श्रींच्या चरणी नतमस्तक होत साकडे घातले.
यावेळी युवा मोर्चाचे शहराध्यक्ष डॉ.किरण देशमुख , माजी शहराध्यक्ष नरेंद्र काळे , माजी स्थायी समिती सभापती संजय कोळी , माजी नगरसेवक राजू पाटील , संजय कणके, राजू भिंगारे, देविदास बनसोडे , राहुल शहाबादे, सचिन लकडे, योगेश शिरशेट्टी यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते…




