मुख्यमंत्र्यांचे मुख्य आर्थिक सल्लागार तथा मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी यांनी सोलापूर महानगर पालिकेकडून घेतला शहरातील विविध महत्वपूर्ण प्रकल्पांचा आढावा…

सोलापूर —
सोलापूर महानगरपालिकेच्या परिवहन विभाग, छत्रपती संभाजी महाराज तलाव महात्मा गांधी प्राणी संग्रहालय तसेच शहरातील विविध महत्त्वपूर्ण प्रकल्पांच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी .श्री प्रवीण परदेशी, मा. मुख्यमंत्र्यांचे मुख्य आर्थिक सल्लागार तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी, मित्रा यांच्या अध्यक्षतेखाली आज सोलापूर महानगरपालिकेत महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली.

महात्मा गांधी प्राणी संग्रहालय व सांडपाणी प्रक्रिया व बायोगॅस प्रकल्प (STP Plant) यासह शहराच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने घेतलेल्या या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण प्रकल्पांवर सविस्तर चर्चा झाली. या बैठीकत भुयारी गटारी योजना, अमृत योजना व राज्यस्तरीय नगरोत्थान योजनेतील कामांची सद्यस्थिती व प्रगतीचा आढावा घेण्यात आला.सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (STP)देगाव येथील सांडपाणी प्रक्रिया या प्रकल्पामुळे पाणी व्यवस्थापनाबरोबरच शहरातील पर्यावरणीय शाश्वततेलाही चालना मिळणार आहे.

महात्मा गांधी प्राणी संग्रहालय विकास आराखडा (DPR)2025 ते 2030 या कालावधीसाठी 5 वर्षांचा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे.टप्प्याटप्प्याने विकासकामे हाती घेतली जाणार असून NTPC कडून CSR फंड व DPC कडून काही निधी मिळालेला आहे. उर्वरित निधी अन्य स्रोतांतून मिळवण्याबाबत चर्चा झाली.या बैठकीत मनपाचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, उपायुक्त आशिष लोकरे, उपायुक्त तैमूर मुलाणी, मुख्य लेखा अधिकारी रत्नराज जवळगेकर, प्र. सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चौबे, नगर अभियंता सारिका अक्कूलवार, तपण डंके, रामचंद्र पेंटर, जागतिक बँकेचे प्रतिनिधी तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.यावेळी मुख्य आर्थिक सल्लागार मा. प्रवीणसिंह परदेशी यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की सोलापूर शहराचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी केंद्र व राज्य शासनामार्फत आवश्यक सहकार्य करण्यात येईल.

प्रलंबित प्रकल्प वेळेत पूर्ण करून नागरिकांना दर्जेदार सेवा देण्याचे उद्दिष्ट ठेवून कार्य केले पाहिजे.”प्रलंबित कामे वेळेत पूर्ण करण्याचे व अडचणी दूर करण्याचे निर्देश परदेशी यांनी दिले.
जागतिक बँकेचे प्रतिनिधींचा आढावा दौरा
बैठकीनंतर जागतिक बँकेचे प्रतिनिधींनी मनपाच्या सात रस्ता बस डेपो, छत्रपती संभाजी महाराज तलाव, महात्मा गांधी प्राणी संग्रहालय तसेच देगाव येथील STP प्लांटची पाहणी केली.यावेळी NTPC थर्मल पॉवर येथे भेट दिली.
आयुक्तांशी चर्चा
संध्याकाळी मनपा आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांच्या निवासस्थानी दिवसभर झालेल्या बैठकीसंदर्भात स्वतंत्र चर्चा घेण्यात आली. एकूणच, या आढावा बैठकीत सोलापूरच्या पाणीपुरवठा, परिवहन, सांडपाणी प्रक्रिया, महात्मा गांधी प्राणी संग्रहालय विकास आराखडा, छत्रपती संभाजी महाराज तलाव, निगडित प्रकल्पांना गती देण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.



