भ्रष्टाचार पदाधिकारी पासून सरस्वती मंदीर प्रशाला मुक्त करणार अनिरुद्ध देशपांडे…

सोलापूर:
सोलापुरातील सुमारे १२५ वर्षांपासून शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्यरत असणारी सरस्वती मंदीर प्रशालेला भ्रष्ट्र पदाधिकारी पासून ग्रहण लागले. तात्कालिन बेजबाबदार पदाधिकारी नाथाच्या दबावाला बळी पडत, पांडूरंगांच्या आर्शिवादाने पुरातत्व खात्याच्या आदेशाला केराची टोपली दाखवत, सर्व नियम धाब्यावर बसवून जणू काही संस्था आपल्या बापाची जहागीरी समजून सहाशे विद्यार्थाच्या जिवाशी खेळ करत, कोरोना रोगाच्या आडून सन २०२१ ते एप्रील २०२२ या कालखंडात सरस्वती मंदीर प्रशालेचे बांधकाम केले.छातीला बरगड्या नसून उर बडवत हम भी कुछ कम नही असे विचारवंत अभ्यासू विधीतज्ञ समाजात व शैक्षणिक क्षेत्रात उजळ माथ्याने मिरवत आहेत. वास्तवीक पहाता भूईकोट किल्ल्यापासून फक्त 66 मीटर अंतरावर सुमारे 15 ते 20 फूट खोल खड्डे उत्खनन करत 40 फूट उंच RCC पिलर्स उभे करत बांधकाम केले.
महानगर पालिकेच्या नगररचना बांधकाम खात्याला किरकोळ दुरुस्तीची परवानगी देण्याचा अधिकार नसताना पुरातत्व विभागाच्या नियमाप्रमाणे 300 मीटर अंतराच्या आत जर कोणतेही बांधकांम किंवा दुरुस्ती, किरकोळ रिपेअरी करायची असल्यास पुरातत्व विभागाची पुर्व परवानगी घेणे आवश्यक असून जर परवानगी न घेता बांधकाम केले असता, तो फौनदारी गुन्हा समजला जातो. सदर संस्थेच्या तात्कालीत बेजबाबदार विद्वान कायदेविषयक ज्ञान असणाऱ्यांनी पुरातत्व खात्याच्या नोटीशीला केराची टोपली दाखवत बांधकाम पूर्ण केले.
शेवटी कायदा दाखवून केंन्द्र शासनाच्या पुरातत्व खात्याने यांची गंभीर दखल घेत दि ३०/९/२०२५ रोजी फौजदार चावडी पोलीस स्टेशन मध्ये एफ आर आय क्रमांक 0649 असा दाखल केला असून कलम 30/ अ/ अन्वये तात्कालीन अध्यक्ष ॲड रघूनाथ दामले,सचिव ॲड पांडूरंग देशमुख, उपाध्यक्ष शिरीष तुळजापूरकर यांचेवर गुन्हे दाखल झाले. उशीरा का होईना पुरातत्व खात्याला जाग आली आणि नाथाच्या वर्चस्वाला तडा दिला. पण बेजबाबदार सोलापूर महानगर पालीका नगर रचना कार्यालय बांधकांम खाते प्रकरणात हाताची घडी तोंडावर बोट.
माहिती अधिकाराखाली माहिती घेण्याचा प्रयन्त केला,पण मुळ प्रश्नाला बगल देण्यात धन्यता मानत आहे.न्यूज एक्सप्रेस चॅनल व संघर्ष योद्धा साप्ताहीक तसेच k सिटी न्यूज चॅनल सवेरा न्यूज चॅनलनी वारंवार बेकायदेशीर बांधकामाचा पाठपुरावा करत हे प्रकरण तडिस नेवून अखेर न्याय मिळवून दिला. संस्थेच्या विद्यमान सचिव तसेच भारतीय जनता पार्टीच्या विद्यमान शहर अध्यक्षा रोहीणी ताई तडवळकरांनी यांनी बोगस खोटी तक्रार पोलीस आयुक्तालयात करून स्वत:चेच पितळ उघडे पाडले,
या प्रकरणात व्लिन चिट देवून पोलीस खात्याने सम्मानपुर्वक वागणूक देत निर्दोष मुक्तता केली. तेव्हा या संस्थेच्या पदावर असणारे विद्यमान अध्यक्ष ॲड पांडूरंग देशमुख सचिवा रोहीणी तडवळकर सदस्य ॲड रघूनाथ दामले या भ्रष्टाचारी बेजबाबदार पदाधिकारी यांचा संस्थेने राजीनामा तात्काळ घेवून संस्थेतून हाकालपही करावी अन्यथा काही महत्वाचे कागदपत्रे, दस्तऐवज गायब करण्याची शक्यता नाकारता येत नाही.
संस्था अडचणीत येण्याची शक्यता असून असे संस्थेचे माजी ज्येष्ठ संचालक, विद्यमान सभासद, विद्यमान पदाधिकारी नाथाच्या दबावाला घाबरत नाव न घेता सध्याची संस्थेची माहिती खाजगीत देत आहे शैक्षणिक क्षेत्रात या विषयी चवीने चर्चा होत आहे. राजीनामे घेणार का या विषयी ? तुर्त येथे थांबू



