crimemaharashtrapoliticalsocialsolapur

शालेय महाविद्यालयीन विद्यार्थी शाळेमध्ये स्वातंत्र दिन साजरा करण्यासाठी गेली आणि परतलीच नाही फौजदार चावडी पोलिसांनी आणला गुन्हा उघडकीस नेमक काय घडलं पाहा?…

दिनांक १५/८/२०२५ रोजी रात्री फिर्यादी यांनी पोलीस ठाणे येथे येवुन कळवीले की, दिनांक १५/०८/२०२५ रोजी सकाळी ०६.०० वा. चे सुमारास त्यांची १३ वर्षे वयाची मुलगी तीच्या शाळेमध्ये स्वातंत्र दिन साजरा करण्यासाठी गेली असता ती परत घरी आलीच नाही.तिला कोणीतरी अज्ञात इसमाने अपहरण करुन नेले आहे अशी तक्रार दिल्याने फौजदार चावडी पोलीस ठाणे येथे त्यांची तक्रार तात्काळ दाखल करुन त्याप्रमाणे गु,र, नं. ६०९/२०२५ भा.न्या. संहिता २०२३ चे कलम १३७ (२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

हा गुन्हा दाखल होताच गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेवुन वरिष्ठ पोलीस निरीक्षक महादेव राऊत यांनी व दुय्यम पोलिस निरीक्षक तानाजी दराडे यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक क्षिरसागर व पोलिस उप निरीक्षक बावणे यांना गुन्हे प्रकटीकरण पथकासोबत सदर गुन्हयातील आरोपीत यांचा तात्काळ शोध घेण्याबाबत आदेश दिले. त्याप्रमाणे सपोनि संजय क्षिरसागर व त्यांचे पथकाने तसेच पो.उप.निरी. बावणे यांनी तात्काळ तांत्रीक पध्दतीने व गुप्त बातमीदारामार्फत शोध सुरु केला. पोलीसांनी तांत्रीक पदधतीने शोध घेवुन तसेच अपहृत मुलीच्या मैत्रीणी यांचेकडे चौकशी करुन, त्याआधारे तपास करीत असताना पोलीसांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, अपहृत मुलगी हिस इसम नामे सिद्राम बुक्का रा. कुंभारी ता. दक्षिण सोलापुर याने पळवून नेले आहे. तात्काळ सदर इसमाचा शोध घेतला असता तो कारवे नगर, ता. कराड जि. सातारा येथे अपहृत मुलीस घेवुन गेल्याबाबत माहीती मिळाली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेवुन वरिष्ठ पोलीस निरीक्षक महादेव राऊत यांनी एका क्षणाचाही विलंब न लावता तपासकामी पोलिस उपनिरीक्षक बावणे व डीबी पथकामधील अंमलदार यांना कराड येथे रवाना केले व सपोनि/क्षिरसागर यांना तांत्रीक तपास करण्याबाबत सांगीतले. कराड येथे जावुन तांत्रीक माहीतीच्या आधारे तपास करता आरोपीत नामे सिद्राम नागप्पा बुक्का वय १९ वर्षे, रा. कुंभारी ता. दक्षिण सोलापुर हा कारवे नगर, ता.कराड, जि. सातारा येथे मिळुन आला. आरोपीत सिद्राम बुक्का यास ताब्यात घेवुन त्याचे ताब्यातुन अपहृत मुलीची सुटका करण्यात आली आहे व आरोपीतास अटक करुन पुढील तपास पोलिस उप निरीक्षक सतीश बावणे हे करीत आहेत.

अशाप्रकारे पोलीसांनी माहीती मिळाल्यापासुन कौशल्यपुर्ण तपास करुन २४ तासाचे आत अपहृत मुलीचा शोध घेवुन आरोपीस ताब्यात घेवुन हा गुन्हा उघडकीस आणला.

ही कामगिरी ही मा. पोलीस आयुक्त श्री.एम. राजकुमार पोलीस उपआयुक्त (परिमंडळ) विजय कबाडे, सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग -१, प्रताप पोमण, वरिष्ठ पोलिस निरीक्षक महादेव राउत, दुय्यम पोलिस निरीक्षक तानाजी दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय क्षिरसागर, पोलिस उपनिरीक्षक सतीश बावणे, पोना/अयाज बागलकोटे, पोकों/अमोल खरटमल, पोकों/सुरज सोनवलकर, पोकों/अमोल पवार यांनी केलेली आहे…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button