भविष्यातील प्रकल्पासाठी सहकार्य करू पालकमंत्री गोरे यांनी दिली वाडिया हॉस्पिटलला भेट….

सोलापूर :
एन.एम. वाडिया चॅरिटेबल हॉस्पिटलमुळे गरीब गरजू रुग्णांची सोय झाली असून या हॉस्पिटलच्या भविष्यातील प्रकल्पासाठी सहकार्य करू अशी ग्वाही पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली
शनिवारी गोरे यांनी वाडिया चॅरिटेबल हॉस्पिटलला भेट देऊन ओपीडी, तातडीची सेवा, आयसीयू, रोगनिदान विभाग तसेच चालू असलेल्या ‘सेवाव्रती योजने’ची पाहणी केली. सेवा आणि समर्पण भावनेने राबवल्या जाणाऱ्या कार्याचे त्यांनी कौतुक केले. हॉस्पिटलच्या प्रमुखांशी संवाद साधत, समाजोपयोगी उपक्रम व भविष्यातील प्रकल्पांसाठी सहकार्य करण्याचे तसेच हॉस्पिटलला पुन्हा भेट देण्याचे आश्वासन दिले.
हॉस्पिटलच्या कार्याची माहिती ॲड. नितीन हबीब, वैद्यकीय सेवांची माहिती डॉ. सुनील घाटे, नूतनीकरणाविषयी माहिती कल्पेश जव्हेरी आणि ‘सेवाव्रती योजना’विषयी माहिती सविता लळीत यांनी दिली.
कार्यक्रमास रा. स्व. संघाचे पश्चिम महाराष्ट्र कार्यकारणी सदस्य हेमंतराव हरहरे, पुणे विभागाचे कार्यवाह मुकुंदराव कुलकर्णी, सोलापूर जिल्हा कार्यवाह ऋषिकेश कुलकर्णी, गव्हर्निंग कौन्सिल सदस्य डॉ. राजेंद्र घुली, डॉ. संदीप भागवत, डॉ. शिरीष कुमठेकर, संजय पटेल, श्रीधर रिसबुड, वासुदेव बंग, हेमंत चौधरी, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. ज्ञानेश्वर सोडल, सेवाव्रती व हॉस्पिटलचा कर्मचारी वर्ग उपस्थित होता.
भव्य उद्घाटन भव्य उद्घाटन भव्य उद्घाटन
स्वप्न पाहिले श्रमिकांनी, स्वप्नपूर्ती केली विजय मालकांनी

राष्ट्रतेज अटल कामगार गृहनिर्माण सहकारी संस्थेच्या सदानिका लोकार्पण सोहळ्याचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा लाडके भाऊ मा. ना.श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या शुभहस्ते रविवारी १७ ऑगस्ट रोजी जल्लोषात उद्घाटन….
स्थळ :- राष्ट्रतेज अटल गृहनिर्माण प्रकल्प गट नंबर १२/२ बक्षी हिप्परगा रोड दहिटणे सोलापूर
वेळ:- सकाळी ठीक ९ वाजता
या कार्यक्रमास राष्ट्रतेज अटल गृहनिर्माण प्रकल्पाच्या सदस्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे…
विनित
श्री .सुरेश बिराजदार. आण्णाराव कानडे
{ चेअरमन } { सचिव }
व
राष्ट्रतेज अटल गृहनिर्माण सहकारी संस्था मर्या.दहिटणे सोलापूर



