आंतर जिल्हा घरफोडी, वाहन चोरी करणा-या गुन्हेगारांना केले जेरबंद, पुणे, सातारासह सोलापुर जिल्हयातील ०३ गुन्हे उघड, स्थानिक गुन्हे शाखेकडुन उल्लेखनीय कामगिरी…

सोलापूर
राज्यामध्ये विनापरवाना अवैदय अग्निशस्त्र वापरून होत असलेल्या गुन्हयांच्या पार्श्वभूमीवर मा. श्री अतुल कुलकर्णी, पोलीस अधीक्षक, सोलापुर ग्रामीण व मा. श्री प्रितम यावलकर, अप्पर पोलीस अधिक्षक, सोलापूर ग्रामीण यांनी अवैदयरित्या, विनापरवाना शस्त्र बाळगणारे इसमांवर कारवाई करणेबाबत श्री संजय जगताप, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा यांना सुचित केले होते. त्यावरून पोनि श्री संजय जगताप यांनी स्थानिक गुन्हे शाखे कडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना गुन्हे उघडकीस आणणे कामी मार्गदर्शन व सुचना दिल्या होत्या.
दिनांक ०९.०८.२०२५ रोजी गोपनीय बातमीदारामार्फत मा. श्री संजय जगताप, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा यांना बातमी मिळाली की, तीन इसम त्यांचे कब्जात देशी बनावटीचे पिस्टल बाळगून ते एका निळ्या रंगाचे स्कॉर्पीओ चारचाकी वाहन क्रमांक MH 12 CY 5041 या वाहनातुन कुंभारी येथून निघून मौजे वळसंग कडे रवाना झाले असलेबाबत खात्रीशीर बातमी मिळाली.
सदरच्या माहितीच्या अनुशंगाने सपोनि विशाल वायकर यांचे पथक सोलापुर ते वळसंग महामार्गावर कारवाई करता रवाना करण्यात आले. वळसंग हद्दीतील वळसंग वाडा हॉटेलच्या अलीकडे ५०० मीटर अंतरावर बातमीप्रमाणे एक स्कॉर्पीओ वाहन मिळुन आल्याने सदर ठिकाणी सापळा रचुन संशयीत इसमांना ताब्यात घेतले असता त्यांच्या ताब्यात एक सिल्वर रंगाचे धातुचे देशी बनावटीचे गावठी पिस्टल किं.अं. ५०,०००/-, एक जिवंत काडतुस किं.अं. २००/- व एका निळ्या रंगाचे स्कॉर्पीओ चारचाकी वाहन क्रमांक MH 12 CY 5041 किं.अं. ५,००,०००/- तसेच दोन मोबाईल १) विवो कंपनीचे अं. किं. १२,०००/- व २) सॅमसिंग कंपनीचे १०,०००/- असे एकुण ५,७२,०००/- किंमतीचे मुद्देमाल मिळुन आल्याने, सदरचे गावठी पिस्टल हे विक्री करण्यासाठी आणले असलेबाबत सागिंतल्याने सदर तीन्ही इसमांविरूध्द वळसंग पोलीस ठाणे गु.र.नं. ३७०/२०२५ भारतीय शस्त्र अधि. १९५९ कलम ३,७,२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आले आहे.
नमुद आरोपीतांना सपोनि/वायकर यांनी विश्वासात घेवून अधिक चौकशी केली असता सदर आरोपीतांनी त्यांच्या साथीदारासह वळसंग पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे होटगी येथील सराफ दुकानाचे शेटर उचकटुन घरफोडी केल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच सदरचे घरफोडी करताना वापरलेले स्कॉर्पीओ वाहन शिरवळ जि. सातारा येथुन चोरी केल्याचे व एक पांढ-या रंगाचे ईको कार उरळी कांचन येथुन चोरी केल्याचे निष्पन्न झाले आहे.
वळसंग पोलीस ठाणे गु.र.नं. ३७०/२०२५ भारतीय शस्त्र अधि. १९५९ कलम ३,७,२५ प्रमाणे दाखल तपासा दरम्यान अक्षयसिंग बिरूसिंग जुनी वय. २१ वर्षे, रा. बिराजदार नगर, हडपसर, पुणे याने त्याच्या साथीदारासह वळसंग पोलीस ठाणे गु.र.नं. ३६२/२०२५ बीएनएएस क.३३१ (४), ३०५ (अ) ३(५) गुन्हयाची कबुली देवून त्यातील गेला माल पैकी ४२७ ग्रॅम वजनाचे बाजारभावाप्रमाणे किं. अं. ४९,१०५/- रू किंमतीचे चांदीचे दागिने काढुन दिल्याने तपासकामी जप्त करण्यात आले असुन असे एकुण ६,२१,१०५/- रू. किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे खालीलप्रमाणे
1) अक्षयसिंग बिरूसिंग जुनी वय. २१ वर्षे, रा. बिराजदार नगर, हडपसर, पुणे
२) धरमसिंग आदलसिंग गोके वय. २९ वर्षे रा. संभाजी नगर, झोपडपट्टी, थारूर, जि. बीड
३) सुरज रामु धोत्रे वय. २९ वर्षे रा. अविनाश नगर, सुनिल नगर एमआयडीसी, सोलापुर जि. सोलापुर
पाहिने आरोपी यांची नावे :-
1) लकीसिंग गब्बरसिंग टाक रा. रामटेकडी जि. सोलापुर
२) सागर कोळी रा. कलावती नगर, सुनिल नगर एमआयडीसी, सोलापुर
३) अविनाश राठोड रा. दोड्डी तांडा, ता. दक्षिण सोलापुर जि. सोलापुर
4) अभिषेक धोत्रे रा. सुनिल नगर, एमआयडीसी, सोलापुर
ही कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अक्कलकोट विभाग श्री विलास यामावार, व.पो. नि. संजय जगताप स्थानिक गुन्हे शाखा, सोलापुर ग्रामीण यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक, विशाल वायकर, पोसई सुरज निंबाळकर, सहा. पोलीस निरीक्षक प्रकाश कारटकर, पोहेकों/सलीम बागवान, पोहेकों/विजय भरले, पोहेकों/विरेश कलशेट्टी, मपोहेकॉ/६६८ जाधव, पोलीस शिपाई / बाळराजे घाडगे, सागर ढोरे-पाटील, अन्वर अत्तार, हरिष थोरात, राहुल दोरकर, समर्थ गाजरे, यश देवकते, योगेश जाधव, चापोकों/दिलीप थोरात, सुनिल पवार तसेच वळसंग पोलीस ठाणे कडील सपोनि अनिल सनगल्ले, पोसई रविराज कांबळे, पोकॉ/१००० व्हनमोरे यांनी बजावली…



