maharashtrapoliticalsocialsolapur

वैभव वाघे खून खटला ! समरसेनजीत गायकवाडसह बाकी चौघांचे जामीन अर्ज फेटाळले …

 

सोलापूर-

सिध्दार्थ हौसिंग सोसायटी सोलापूर येथे राहणाऱ्या वैभव वाघे याचा लोखंडी रॉड, लाकडी दंडुका, फरशी, पट्टा या प्राणघातक हत्यारासह अमानुष मारहाण करून त्याचा खून केल्याप्रकरणी तसेच पिडीत महिला, रितेश विलास गायकवाड, निलेश शिरसे, सागर शिरसे, सुमित विलास गायकवाड यांना मारहाण करून गंभीर जखमी करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी माजी उपमहापौर प्रमोद गायकवाड त्यांची दोन्ही मुले प्रसेनजीत व हर्षजीत या तिघांचे जामीन अर्ज फेटाळल्यानंतर आज बाकी आरोपी संजय उर्फ सोन्या देवेंद्र गायकवाड, मनोज राजू अंकुश, सनी निकंबे, समरसेनजीत प्रमोद गायकवाड यांचे नियमित जामीन अर्ज अतिरिक्त सत्र न्यायाधीश सूरज केंद्रे सो यांनी फेटाळून लावले.

 

यामध्ये मुळफिर्यादीतर्फे अँड. संतोष वि. न्हावकर यांनी फिर्यादीचे प्रतिज्ञापत्र दाखल करून जामीनास विरोध दर्शवून आरोपींविरुद्ध यापूर्वी दाखल असलेल्या गुन्ह्यांची पार्श्वभूमी निदर्शनास आणली. सरकार पक्षाने युक्तिवाद करताना आरोपींनी मयतास गाडी वरून पाडून लोखंडी राँडने व फरशीने मारहाण करून आरोपींनी संगनमत करून व कट रचून खून केला असल्याने स्वकृतदर्शनी पुरावा असल्याचे न्यायालयाचे निदर्शनास आणून दिले .

 

 

 

सदरचा युक्तिवाद ग्राह्य़ मानून न्यायालयाने संजय उर्फ सोन्या देवेंद्र गायकवाड, मनोज राजू अंकुश, सनी निकंबे, समरसेनजीत प्रमोद गायकवाड यांचे जामीन अर्ज नामंजूर केला.
यात मुळ फिर्यादीतर्फे अँड. संतोष वि. न्हावकर, अँड. राहुल रुपनर, सरकार पक्षातर्फे अँड.दत्तूसिंग पवार तर आरोपीतर्फे अँड. शशी कुलकर्णी, अँड. राज पाटील व अँड. किरण सराटे हे काम पाहत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button