crimemaharashtrapoliticalsocialsolapur

आषाढी वारीत पोलिस खात्याच्या विना परवाना ड्रोनचा वापर करणाऱ्या ३२ ड्रोनवर पोलिस अधीक्षकांनी केली कारवाई…

पत्रकार बांधवांच्या वतीने पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांचा सत्कार....

अवघे गर्जे पंढरपूर ! ! !..

सोलापूर

विठ्ठल.. विठ्ठलविठ्ठला ! !  ! च्या जयघोषात पंढरपूरची आषाढी वारी भक्तिमय वातावरणात संपन्न झाली. जिल्हाधिकारी ,पोलिस अधीक्षक, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी या वारीचे उत्तम नियोजन केले होते.त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हा प्रशासन व पोलिस खात्याचे विशेष कौतुक केले. याबाबत पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी बुधवारी ग्रामीण पोलिस मुख्यालयात पत्रकारांशी मनमोकळा संवाद साधला. आषाढी वारीच्या एकूणच नियोजनाबाबतीत पत्रकारांशी बोलताना पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी म्हणाले, राज्य शासनाच्या आदेशाने पंढरपूरची आषाढी वारी भक्तिमय वातावरणात संपन्न झाली. जवळपास २८ लाख भक्त – भाविक महाराष्ट्रासह देशभरातून मोठ्या संख्येने पंढरपुरात दाखल झाले होते.

 

हरित क्रांती व अपघात मुक्तीचा संदेशाचे जन प्रबोधन या वारी दरम्यान पोलिस प्रशासनाकडून करण्यात आले .पालखी मार्गाच्या प्रमुख रस्त्यावर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.या वारीत दीड ते दोन लाख भक्त भाविकांनी विठू माऊलीचे दर्शन घेतले. या वारीत छोट्या – छोट्या चिमुकल्यांना घेऊन अनेक भक्त भाविक सहभागी झाले होते .अशा भाविकांची पोलिस प्रशासनाने विशेष काळजी घेतली. वारीच्या एकूणच नियोजनासाठी राज्य शासनाने जिल्हा नियोजन समिती कडून ४ ते ५ कोट रुपयांचा विशेष निधी उपलब्ध करून दिला होता.

रेकॉर्डवरचा गुन्हेगारांचा शोध घेऊन ,तसेच वारीत बहुरूपी वेशभूषा धारण करून चैन स्नेचिंग चे गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले. या वारीत ५० हजार हून अधिक सहभागी फेरीवाले ,चारचाकी ,दुचाकी ,तीनचाकी वाहनासाठी वाहतूक शाखेच्या पोलिसांनी पार्किंग ची विशेष व्यवस्था केली होती.त्यामुळे पहिल्यांदाच कोणत्याही प्रकारची जीवितहानीची घटना घडली नाही.२०० हॉट लाइन फोन व वायरलेस टेक्नॉलॉजीचा वापर या वारीत करण्यात आला.

 

वारीच्या अलोट गर्दीचे चित्रण ड्रोन कॅमेरात टिपण्यासाठी अमेरिकेवरून भक्त भाविक पंढरपुरात आले होते .चित्रपत्र सृष्टीतील तसेच काही युट्यूबर्स ने विना परवाना ड्रोन चा वापर केला होता .अशा ३२ ड्रोनला पोलिस प्रशासनाने हाणून पाडले.
मंदिर समितीच्या वतीने वारीत सहभागी जवळपास १५० ते २०० मुख्य मान्यवरांसाठी VIP पासेसची व्यवस्था करण्यात आली होती.

 

पोलिस अधीक्षकांच्या संकल्पनेतून व आदेशान्वये माउली स्कॉड चे विशेष पथक तयार करण्यात आले होते.या स्कॉड ने रेकॉर्डरवच्या व चैन स्नेचिंग चे गुन्हे करणाऱ्या १५६ आरोपींना विशेष लक्ष ठेवून ताब्यात घेतलं. एकूण तीस तोळे सोने ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींकडून पॉलिसी हस्तगत केले.
आधुनिक तंत्र प्रणालीचा AI चा वापर या वारी दरम्यान पोलिस प्रशासनाकडून करण्यात आला. याद्वारे पंढरपूर शहरातील विविध ठिकाणच्या दृश्यांवर पोलिसांची करडी नजर होती.
नदी तलावावर पोलिस प्रशासनाचा कडेकोट बंदोबस्त तर होताच शिवाय कोणतीही दुर्घटना घडू नये साठी NDRF च्या पथकाचा व मंदिर समितीच्या लोकांना समन्वय साधून बंदोबस्त लावण्यात आला.

 

या वारीत सहभागी भक्तभाविका मधील हार्ट अटॅक ने,वैद्यकीय कारणास्तव, पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या , ४४ भक्त भाविकांचा समावेश असल्याची पोलिस अधीक्षकांनी माध्यमांशी बोलताना सांगितली…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button