अन्नछत्र मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे भोसले यांच्याबाबत एकेरी उल्लेख केल्याने मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारीची घटना…

सोलापूर
संभाजी ब्रिगेड चे संस्थापक अध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्या वरील भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ शहरातील शासकीय विश्रामगृह येथे मराठा समाजाची बैठक आयोजित करण्यात आली होती .या बैठकीस अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे भोसले , श्री अक्कलकोट देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश इंगळे ,राजन जाधव ,माजी उपमहापौर दिलीप कोल्हे, सकल मराठा समाज समन्वयक माऊली पवार ,दीपक वाडदेकर , मतीन बागवान ,संभाजी भोसले ,श्याम कदम ,सोमनाथ राऊत ,प्रवीण घाडगे , यांच्यासह मराठा समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती .
या दरम्यान बैठक सुरू असतानाच एका वकिलाने उभे राहून अन्नछत्र मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे भोसले यांच्या बाबत चुकीचे विधान केले .त्यामुळे दोन गटातील बाचाबाचीचे रूपांतर हाणामारीत झाले. अमोल राजे भोसले यांच्याबाबत एकेरी शब्दात उल्लेख करणाऱ्या वकिलाचा आणि संभाजी ब्रिगेडचा काडीमात्र संबंध नसल्याची प्रतिक्रिया अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे भोसले ,मराठा क्रांती मोर्चा दिलीप कोल्हे ,मराठा क्रांती मोर्चा समन्वयक दिलीप कोल्हे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितली .
अमोलराजे भोसले यांच्या बद्दल बेताल वक्तव्य करून एकेरी शब्दात उल्लेख करणाऱ्या वकिलास अमोलराजे भोसले समर्थकांनी चांगलाच चोप दिला . घटनेची माहिती मिळताच सदर बझार पोलिसांनी शासकीय विश्रामगृह येथे धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली . या घटनेनं शहर परिसरात एकच खळबळ उडाली…



