india- worldmaharashtrapoliticalsocialsolapur

लग्नाचे अमिष दाखवून बालिकेवर अत्याचार केल्याप्रकरणी युवकास कोल्हापूर उच्च न्यायालयातून जामीन मंजूर….

 

HTML img Tag Simply Easy Learning

सोलापूर

 

 

लग्नाचे अमिष दाखवून बालिकेवर अत्याचार केल्याप्रकरणी बाळू मीरा मासाळ वय 34, रा:- गाणेवाडी ता मंगळवेढा जि सोलापूर यास कोल्हापूर उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती श्री.सचिन देशमुख यांनी जामीन मंजूर केला.

या हकीकत अशी की, दिनांक 14/7/2025 रोजी यातील फिर्यादी व तिची आई हे पहाटे चार वाजता नातेवाईक मयत झाले कारणाने अंत्यविधीसाठी गेले होते. अंत्यविधी उरकून घरी आले असता पीडिता हि घरात मिळून आली नाही त्यामुळे त्यांनी तिची शोधाशोध केली तसेच पोलिसात तक्रार देखील दिली होती.
दिनांक 28/7/2025 रोजी पीडिता व आरोपी यांना आरोपीच्या बहिणीने पोलिस ठाण्यात हजर केले. आरोपीने पीडितेवर तिचे राहते घरी व वेगवेगळ्या ठिकाणी लग्नाची अमित दाखवून शरीर संबंध केले असे पिडीतेने पोलिसांसमोर जबाब नोंदविला.
त्यावरून पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला व आरोपीस अटक करण्यात आली होती.

 

 

 

 

आरोपीने जिल्हा व सत्र न्यायालय पंढरपूर येथे जामीन मिळण्यासाठी अर्ज दाखल केला होता. तो अर्ज न्यायालयाने फेटाळला होता.

त्यावर आरोपीने ॲड.रितेश थोबडे यांचे मार्फत कोल्हापूर उच्च न्यायालयात जामीन मिळण्याकरिता अर्ज दाखल केला होता.

 

 

 

सदर अर्जाच्या सुनावणी वेळी ॲड. रितेश थोबडे यांनी आपले युक्तीवादात, गुन्ह्याचा तपास पूर्णत्वात आला असून आरोपीस कोठडीत ठेवल्याने कोणतीही फलनिष्पत्ती होणार नाही, असा युक्तिवाद मांडला, त्यावरून न्यायमूर्तींनी 50,000/- रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला.

 

 

यात आरोपीतर्फे ऍड.रितेश थोबडे यांनी तर सरकारतर्फे यांना ॲड. एन.बी. पाटील यांनी काम पाहिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button