educationalindia- worldmaharashtrapoliticalsocialsolapur

संदीप डोंगरे यांची SRFTI कोलकाता येथील प्रतिष्ठित फिल्म रिसर्च फेलोशिपसाठी निवड….

 

 

सोलापूरच्या संदीप डोंगरे यांची सत्यजित राय फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट (SRFTI), कोलकाता येथील रिसर्च फेलोशिप प्रोग्रॅमसाठी निवड झाली आहे. SRFTI ही माहिती आणि प्रसारण मंत्रालय, भारत सरकार अंतर्गत कार्यरत एक नामांकित शैक्षणिक संस्था आहे.

 

 

ही फेलोशिप सहा महिन्यांची असून, संपूर्ण भारतातून केवळ तीन संशोधकांची अत्यंत कठीण निवड प्रक्रिया व संशोधन प्रस्तावाच्या आधारे निवड करण्यात आली आहे.

 

 

 

संदीप डोंगरे यांचे संशोधन हे सोलापुर एक बहुभाषिक शहर आणि इथे प्रदर्शित केले जाणारे चित्रपट, सिंगल स्क्रिन थेटर्स आणि प्रेक्षक अभ्यास याच्या वर आधारित असून, सोलापूर शहर हे चित्रपटाचा सांस्कृतिक वारसा म्हणून अभ्यासले जाणार आहे.

 

 

मार्च २०२४ मध्येही त्यांची SRFTI कोलकाता आयोजित ‘आंतरराष्ट्रीय सिनेमा क्युरेशन कार्यशाळा’साठी देशभरातून निवड करण्यात आली होती. त्यांच्या अभ्यासाची मुख्य दिशा भारतीय चित्रपटाचा इतिहास, चित्रपट अभ्यास, सिने संस्कृती व वारसा आणि माध्यम अभ्यास या विषयांशी संबंधित आहे.

 

 

सध्या संदिप डोंगरे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातुन पीएच.डी. करत आहेत.
ह्या आधी नुकताच त्यांनी अहिल्याबाई होळकर सोलापूर विद्यापीठातून, मास्टर्स ऑफ व्हिज्युवल आर्टस् अभ्यासक्रम पूर्ण केला आहे.

 

 

ही फेलोशिप त्यांच्या शैक्षणिक आणि संशोधन प्रवासातील एक महत्त्वपूर्ण टप्पा असणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia

gem visa